बार्शिटाकळी पोलीसांन कडुन ३ ठिकाणी अवैध गावराण हातभट्टी व अवैध गा.ह. भ. च्या दारुच्या अड्ड्यावर धाड..

बार्शिटाकळी पोलीसांन कडुन ३ ठिकाणी अवैध गावराण हातभट्टी व अवैध गा.ह. भ. च्या दारुच्या अड्ड्यावर धाड
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी  : पोलीस अधिक्षक श्री. अर्जीत चांडक यांनी अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणे करीता ऑपरेशन प्रहार" मोहीम सुरु असुन अवैध धंदयावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश अकोला जिल्हयातील सर्व ठाणेदार यांना दिलेले आहेत. त्याअनुषंगाने आज दिनांक २०/०६/२०२५ रोजी पो स्टे बार्शिटाकळी हद्दतील ग्राम पिंपळखुटा, राजंदा, पुनोती बु. येथील दारुच्या अड्यावर धाड टाकुन एकुण ४२,७०० रु दारु व मु‌द्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) ग्राम पिंपळखुटा येथे ए.एस.आय. अनिल येन्नेवार ब न १८११ सोबत पो.कॉ. मिलींद देशमुख ब न १३७४, पो.कॉ. योगेश पडवळ ब न १८६७, पो. कॉ. मनिष घुगे ब न ३४५, पो. कॉ. ईश्वर पातोंड वन २१६१, म.पो.कॉ. सुमैया ब न २५३५ यांनी गावरान हातभ‌ट्टीच्या दारुच्या अड्‌यावर वेळ सकाळी ०५/३५ वा. चे दरम्यान छापा मारला असता आरोपी नामे विजय उकंडा जाधव वय ४० वर्ष रा. पिंपळखुटा ता बार्शिटाकळी जि. अकोला याचे ताब्यातुन ४० लिटर गा. ह.भ.ची दारु कि.अ. ६००० रुव ३० लिटर सडवा मोहमास कि अ ४५०० रु असा एकुण १०५०० रु मुद्देमाल जप्त केला. २) ग्राम राजंदा येथे पो हे कॉ. अमित सुगंधी व न २८३ सोबत पो. हे. कॉ. मंगेश महाजन ब न २५५ पो.कॉ. मनोज सावदेकर व न १२३९, पो. कॉ. मनिष घुगे ब न ३४५, म.पो.हे.कॉ छाया ब न १३४७, म.पो.कॉ. शबाना ब न ९८५ यांनी गावरान हातभट्टीच्या दारुच्या अड्‌यावर वेळ सायकांळी ६/२५ वा. चे दरम्यान छापा मारला असता आरोपी नामे सुमेश वसंतराव अरखराव वय ३२ वर्ष रा. राजंदा ता बार्शिटाकळी जि. अकोला यावे ताब्यातुन १५ लिटर गा. ह.भ.ची दारु कि.अ. ३००० रु व १८० लिटर सडवा मोहमास कि अ २७,००० रु व इतर साहीत्य ११०० रु असा एकुण ३१,१०० रु मुद्देमाल जप्त केला.
३) ग्राम पुनोती बु येथे ए.एस.आय. धनंजय राउत ब न १५६३ सोबत पो.कॉ. राजु बाभुळकर व न १८०४ यांनी अवैध देशी दारुच्या अड्‌यावर वेळ दुपारी ०४/५० वा. चे दरम्यान छापा मारला असता आरोपी नामे संजय संपत सुलताने वय ५५ वर्ष रा. पुनोती बु. ता बार्शिटाकळी जि. अकोला याचे ताब्यातुन देशी दारुचे सिलबंद १८० एम. एल. चे ११ क्वॉटर कि अंदाजे ११०० रु मुद्देमाल जप्त केला.
अशा वरील प्रमाणे बार्शीटाकळी पोलीसांनी वेगवेगळया ३ ठिकाणी दारुच्या अडयावर छापा टाकुन दारु व इतर मुद्देमाल असा एकुण ४२,७०० रु चा मुद्देमाल जप्त करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे साहेब,  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनमोल मित्तल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बार्शिटाकळी चे पोलीस अमंलदार यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे