दोन दिवसात चोरीचा गुन्हा उघड, तेलगंणातून आरोपीला अटक...
दोन दिवसात चोरीचा गुन्हा उघड, तेलगंणातून आरोपीला अटक....
बार्शिटाकळी पोलीसांची कारवाई...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी पोलीसांनी दोन दिवसात ७० हजाराची चोरी दोन दिवसात उघड करूण आरोपीस तेलंगना तून अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन मनोहर फाळके वय ३२ वर्ष रा पाटखेड यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, २३ जुन रोजी १.५० वाजताच्या सुमारास पंचायत समीती बार्शिटाकळी येथे डाटा फिर्डीगचे काम करीत असतांना त्यांना सहायक लेखाधिकारी यांनी बोलावले ते त्यांना भेटण्या करीता दुसऱ्या रूममधे गेले होते ते परत स्वतःच्या कक्षात आले असता त्यांची स्वतःची काळ्या रंगाची बॅग जी टेबलवर होती ती दिसून आली नाही.
सदर बॅगमधे डेल कंपनीचा लॅपटॉप, पेनडाईव्ह, डीएससी व नगदी ३० हजार रुपये असा ७० हजार २०० रुपयाचा माल चोरीस गेला होता.
बार्शिटाकळी पोलीसांनी आरपीएफच्या मदतीने तेलगंना राज्यातून अवघ्या दोन दिवसात आरोपी सोपान दत्ता खर्चे रा दोनद यास अटक करूण त्यांचे विरुद्ध कलम ३०३ (२) बिएनएस दाखल करुण तपासात घेतले आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक अचर्चीत चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली बार्शि टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण घूमाळ, एएसआय फराज शेख, पोलीस जमादार राजेश जोंधळकर, शिपाई इश्वर पातोंड, गोविंद सपकाळ यांनी केली आहे.
गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप
बार्शिटाकळी : शहरातील गोर गरीबांच्या मुलांना वह्या पुस्तकाचं वाटप करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की आमदार अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने, शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने वह्या व पुस्तकांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना अचानक त्याच्या घरी येऊन वही, पेन, दिल्यामुळे ते विद्यार्थी एकदम खुष झाले. त्यांच्या चेहऱ्या वर फुललेले हास्य ही अनमोल अशी वाढदिवसाची भेट देण्यात आ. अमोल मिटकरी यांचे कार्यकर्ते यशस्वी ठरले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभागा अकोला जिल्हाध्यक्ष प्रकाश खाडे, शंकर शिरसाट, पवन खाडे, रोशन सुरवाडे, मनिष
वाहुळे, भैरेश जाधव, विनोद सरदार, योगेश खाडे, दिनकर इंगळे, राजु जोधळे, ज्ञानेश्वर खाडे, दिनेश जामनिक, जिवक खाडे, प्रेम तायडे, पिटु गोपनारायण, सिद्धार्थ सरदार, सौरभ डोगरे, जित खाडे, पियाषु चोटमल, अकुश खाडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
मास्टर हाजी रफीक यांचे मुख्याध्यापक म्हणून पदग्रहण....
बार्शिटाकळी : तालुक्यातील जावेद खान विद्यालय महान या विद्यालयामध्ये हाजी मोहम्मद रफीक अब्दुल रऊफ नव्याने मुख्याध्यापक झालेले हाजी मोहम्मद रफीक यांचा नुकताच पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेख शहजाद शेख अब्दुल्ला हे होते. मुख्य अतिथी म्हणून मदीना मस्जिद चे सचिव तसेच जमियत ए उलमा चे जिल्हा सदस्य हाजी शब्बीर खान हे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी मास्टर हाजी शब्बीर खान यांचे हस्ते नवनिर्वाचित मुख्यद्यापक हाजी मोहम्मद रफीक यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास मास्टर अजीम खान, मास्टर मुशर्रफ उल्लाह खान, मास्टर सय्यद सादिक, मास्टर रईस अहमद, मास्टर सैय्यद नाझिम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेचा पहला दिवसाचे औचीत साधून पाहुण्यांचे पुष्पहार आणि स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अब्दुल अनिस, शेख मुमताज, शेख इसरार, अब्दुल हकीम तसेच शाळेचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
बलात्कारप्रकरणी आरोपीस अटक...
चान्नीसह पिंजर पोलिसांची कारवाई..
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : दोन वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने शारीरिक, मानसिक त्रास देणाऱ्या युवकावर पिंजर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चान्नी पोलिसांच्या तातडीच्या मदतीने पिंजर पोलिसांनी मंगळवारी (दि. २४ जून २०२५) आरोपी सुनील गजानन देवकर (वय २५, रा. अंधारसावंगी, ता. पातूर, जि. अकोला) याला अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय १७ वर्षे रा. झोडगा, पोलीस स्टेशन पिंजर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) ही अल्पवयीन मुलगी असून, आरोपी सुनील गजानन देवकर रा. अंधारसावंगी हा२०२२ मध्ये डिसेंबर महिन्यात तिचा वारंवार पाठलाग करीत असे. आरोपीने एक दिवस मोटारसायकलवरून तिला जबरदस्तीने बाधागड महान धरणाजवळील जंगलात नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला.
अत्याचारानंतर आरोपीने तिला गावात सोडले; परंतु तिला धमकावले की, "जर तू कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करीन." या भीतीमुळे पीडित मुलगी दीर्घकाळ गप्प राहिली. दरम्यान फिर्यादीच्या तक्रारीवरून पिंजर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८२/२०२५ भा.दं.सं. कलम ३७६, ३७६ (२) (एन) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अधिकारी एपीआय गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चात्री पोलीस स्टेशनच्या सहकायनि मंगळवारी आरोपीला शोधून काढले आणि त्याला अटक करण्यात आली.
शिक्षणाच्या ठिकाणीही त्रास सुरुच
पुढील शिक्षणासाठी पीडितेने कोथळी येथील आश्रमशाळेत अकरावीत प्रवेश घेतला आणि तेथे राहायला सुरुवात केली; मात्र आरोपीने तिला तेथेही त्रास देण्याचे थांबविले नाही. आरोपी सुनील देवकर आपल्या मित्रांसह शाळेजवळ येत असे आणि पुन्हा-पुन्हा तिच्या अश्लील फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिव्यावर शारीरिक अत्याचार करीत असे. तिच्या मनावर सततचा मानसिक दबाव होता. भीतीने अनेक दिवस गप्प राहिल्यानंतर अखेर तिने धाडस एकवटले आणि पिंजर पोलीस स्टेशन गातून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
Comments
Post a Comment