अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताच्या पंचनाम्याला सुरुवात...

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताच्या पंचनाम्याला सुरुवात...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : बुधवारी आणि गुरुवारी पिंजर आणि खेरडा मंडळामध्ये अतिवृष्टीने पावसाचा मोठा हाहाकार झाला. या अतिवृष्टीने सर्व शेत जलमय झाल्यामुळे कुठे बंधारे फुटले, तर कुठे नाले फ टून शेतकऱ्याच्या शेतात सर्व पाणी घुसले आणि शेतकऱ्याच्या पिकाची ऐशीतैशी झाली आहे.
परिणामी, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तातडीने आदेश काढल्यामुळे बार्शिटाकळी तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी तातडीने प्रभारी नायब तहसीलदार अक्षय नागे, तालुका कृषी अधिकारी संध्या करवा, पिंजरचे मंडळ कृषी अधिकारी राठोड, महसूल मंडळ
अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, इत्यादींनी भेंडीमहाल येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी शेताची पाहणी केली आणि तातडीने पंचनामे सर्वेला सुरुवात केली आहे.
यामध्ये अक्षय नागे प्रभारी तहसीलदार तथा नायब तहसीलदार निवासी बार्शिटाकळी, संध्या करवा तालुका कृषी अधिकारी, पिंजरचे मंडळ अधिकारी, कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक, संघपाल वाहूरवाघ पाणी फाउंडेशन बार्शिटाकळी, तालुका समन्वयक, संदीप राठोड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, संदीप थोरात कृषी सहायक, तलाठी मोहिनी थोटांगे, तलाठी ज्ञानेश्वर हजारे, राठोड मंडळ अधिकारी कृषी, सरपंच प्रदीप राठोड, उपसरपंच सुधाकर चव्हाण, पोलीस पाटील राम महल्ले, दिनेश राठोड, अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले मनिष देशमुख, मंगेश देशमुख, साहेबराव जाधव, प्रकाश जाधव, अरविंद जाधव, मदन जाधव, सुधाकर जाधव, रामेश्वर राठोड, विजय चव्हाण, पवन चव्हाण, किसान राठोड, मधुकर राठोड, सर्व इत्यादी शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....