बार्शिटाकळी येथे शांतता समितीची सभा....
बार्शिटाकळी येथे शांतता समितीची सभा
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : येथील पोलिस स्टेशनमध्ये शांतता समिती सभेचे आयोजन २७ जून रोजी करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ हे होते. यावेळी त्यांनी उपस्थित शांतता समिती सदस्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की येणारे सण उत्सव शांततेत आनंदाने साजर करावे, सण उत्सवादरम्यान कोणत्याच प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबत मार्गदर्शन सभेमध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थित शांतता समिती सदस्यांनी सुद्धा शहरातील शांतता विषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शांतता समिती सदस्य अनंत केदारे यांनी केले. येणारे मोहरम सण-उत्सवाला समोर ठेवून सदर शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते. संचालन व आभार गोपनीय विभाग प्रमुख सदानंद सावंग यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शांतता समिती सदस्यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment