बार्शिटाकळी येथे सैनिकांचा सत्कार.....
बार्शिटाकळी येथे सैनिकांचा सत्कार...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी, ता. १९ : शहरातील सर्वज्ञ शोरुम येथे प्रतिष्ठानचे संचालक शेखर काटेकर यांनी भारतीय सैन्य दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या दोन भारतीय सैनिकांचा ग्रामस्थांकडून शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
बार्शिटाकळी तालुक्यातील गोरव्हा येथील आदित्य वाहुरवाघ आणि बार्शिटाकळी शहरातील ढोरे वेटाळ येथील प्रज्वल पळसकार यांनी सात महिन्यांचे आर्मीचे प्रशिक्षण पूर्ण करून सुट्टीवर गावी परत आले असता, गावात ठिक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. देशभक्तीची भावना जागृत करणे आणि नवीन पिढीतील नवयुवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेखर काटेकर, अंनत केदारे, दत्तात्रय साबळे, सौरभअग्रवाल, संजय वाट, आकाश धात्रक, रवी हिवराळे, विजय खांबलकर, संदेश पातोडे, श्रीकुमार पळसकार, मोहसीन, सागर खंडारे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मला लहानपणापासून भारतीय सैन्यात जाण्याची आवड होती. म्हणून ● मी हे क्षेत्र निवडले. त्याकरिता मी अभ्यास व मैदानी चाचण्यांचा सतत जिद्दीने सराव केला. यामुळे मी पहिल्याच प्रयत्नात सैन्यांत भरती झालो. कठोर परिश्रम घेत सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. या वर्दीचा मला सार्थ अभिमान आहे. अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करत रहा. यश हमखास मिळते. - प्रज्वल विजय पळसकार, सैनिक, बार्शिटाकळी.
Comments
Post a Comment