ग्रामीण भागात ३८ वर्ष आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सहायिका वृंदा विजयकर यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार समारंभ...

ग्रामीण भागात ३८ वर्ष आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सहायिका वृंदा विजयकर यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार समारंभ
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
 बार्शिटाकळी : अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागात ग्रामीण भागात सतत 38 वर्ष रुग्णांना सेवा देणाऱ्या आरोग्य सहायिका वृंदाताई विजयकर यांचा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.
 बाळापुर तालुका आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र पारस येथे आरोग्य सहायिका का या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती वृंदा विजयकर या आपल्या नियत वयानुसार वयाच्या 58 व्या वर्षी आरोग्य सहायिका या पदावरून 30जुन 202५ रोजी सेवानिवृत्त झाल्या, त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सेवानिवृत्त सत्कार समारंभ घेण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सल्लागार सलोनी ताई पोटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई जाधव या उपस्थित होत्या, यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष मंगलाताई तितुर, तर जिल्हा सदस्य अनिता इंगळे उपस्थित होत्या 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे