शिक्षण विस्तार अधिकारी शाजिया हक यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तके भेट...
शिक्षण विस्तार अधिकारी शाजिया हक यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तके भेट...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत येत असलेले पी एम श्री जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक केंद्रीय शाळा महान येथील वर्ग पहिलीच्या विद्यार्थयाना बार्शिटाकळी पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले शिक्षण विस्तार अधिकारी शाजिया हक मैडम यांनी नुकताच जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथे भेट देऊन शाळाचे गुणवत्ताची तपासणी केली तसेच वर्ग पहिले मध्ये दाखल झालेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन तसेच इंग्रजी अल्फाबेट व गणिताचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
तसेच त्यांना नवीन शैक्षणिक स्त्राच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनातील शिक्षण क्षेत्रातील पहिले पाऊल व सुरुवातीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महान केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ शाहिद इकबाल खान सरफराज खान शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफीक अहमद खान राही उर्दू विभाग महिला कौन्सिलर व विज्ञान शिक्षिका शगुफ्ता जमाल, मोबीन अहमद खान, गुले राणा, मकसूद अहमद, रिजवान अहमद, अनीस अहमद, कलिमोद्दीन अमरी पठान, संजय पेधे यांची उपस्थिती होती.
यावेळी विस्तार अधिकारी शाजीया-हक मॅडम यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा देऊन पहिले ते आठव्या वर्गाचा आढावा घेतला.
यावेळी महान जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार शगुफ्ता जमाल मॅडम यांनी मानले.
पिंजर पोलिसांकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालय, व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे, सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली,
यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र देऊन स्वाक्षरी घेण्यात आल्यात, त्यामध्ये अमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत ठाणेदार गंगाधर दराडे यांनी मिशन उडान अंतर्गत विविध विषयावर गुरुवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, अमली पदार्थ पासून नुकसान काय? आणि फायदे काय? त्याचे दुष्परिणाम काय होतात? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, त्यांनी पिंजर येथील विविध विद्यालयाला भेटी दिल्यात, यावेळी ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांचे समवेत सर्व पोलीस स्टॉप उपस्थित होता.
भेंडी काजी येथील शेतात घुसले पाणी : पिकाची झाली ऐसीतैशी
बार्शिटाकळी : तालुक्यातील खेर्डा, पिंजर मंडळामधील भेंडी काजी येथील सदन शेतकरी पवन मानतकर यांचे शेतामध्ये नाला फुटल्याने सर्व शेत जलमय झाले आहेत.
परिणामी पिकाची फार मोठी नासाडी झाली आहे, त्यामुळे शासनाने नुकसान झालेल्या अशा शेताचा तातडीने सर्वे करून या भागातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भेंडी काजी आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी केली आहे
गुरुवारी पिंजर आणि खेर्डा मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस झाला, अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते शेत जलमय झाल्याचे दिसत होते.
भेंडी काजी शेत शिवारातील शेतकरी पवन संजय मानतकर यांचे शेतात कपाशी, सोयाबीन इत्यादी पीक आहे, बाजूचा नाला फूटल्या मुळे आणि मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रम ाणात नुकसान झाले आहे, संपूर्ण शेत जलमय झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे, त्यामुळे शासनाने या भागातील नुकसान झालेल्या शेताचा तातडीने सर्वे करून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे.
Comments
Post a Comment