हातोला येथील कुटुंबांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ! 👉घटत्या विद्यार्थी संख्येवर ग्रामपंचायतीचा निर्णय. 👉११ हजार रुपयांचे विद्यार्थ्यांना प्रथम बक्षीस मिळणार
हातोला येथील कुटुंबांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ!
👉घटत्या विद्यार्थी संख्येवर ग्रामपंचायतीचा निर्णय
👉११ हजार रुपयांचे विद्यार्थ्यांना प्रथम बक्षीस मिळणार
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील आळंदा ग्रामपंचायतीने आधीच घरपट्टी व पाणीपट्टी माफीची योजना राबविली असून, आता हातोला ग्रामपंचायतीनेही याच प्रकारचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे आणि यामुळे शाळा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासन चिंतेत आहे. या घटत्या विद्यार्थी संख्येवर मात करण्यासाठी तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे
हा निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपसरपंच बापुराव भोसले, सदस्य सावित्री काकड, शालू घाडगे, वंदना खंडारे, विठ्ठलराव बोचरे, वैभव हातोलकर, राखी आंबेकर, ज्योती घोडे आणि मुख्याधापक व शिक्षक उपस्थित होते. ग्रामपंचायतीने हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी राबविला आहे.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन; प्रथम येणाऱ्यास बक्षिस
जी मुले जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील, त्यांच्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ केली जाईल. तसेच जिल्हा परिषद शाळेतील पाचवी, सहावी आणि सातवीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ग ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. या बक्षिसाची रक्कम मी स्वतःच्या खिशातून देणार आहे. तर घरपट्टी व पाणीपट्टी माफीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असेल, असे हातोला ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष सुरळकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment