जमीअत ए उल्माच्या बैठकीत सदस्य नोंदणी तिव्र करण्याचे आवाहन....
जमीअत ए उल्माच्या बैठकीत सदस्य नोंदणी तिव्र करण्याचे आवाहन....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : स्थानिक जमीअत ए उल्मा चे कार्यालय मीनारा मस्जिद अकोली वेस येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीचे अध्यक्ष स्थानी जमीअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम हे होते.बैठकीत सदस्य नोंदणी तिव्र करण्यासाठी तालुक्यातील जमीअत ए उल्मा चे तालुका व शहर कार्यकारिणी सदस्य व सर्व युनिट तसेच तालुक्यातील सर्व उल्मा व हाफीज यांचा वर्क शाप घेणे, जन्म पत्र मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणीचे अवलोकन करणे आदी विषयावर विचार करण्यात आले. यावेळी तालुका सचिव हाजी सय्यद आशिक,शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान, मौलाना अजीज उल्लाह खान, मोहम्मद सलीम महक, मुफीज खान, हाजी रफीक सेठ, हाजी सय्यद इरफान पहलवान, हाजी सय्यद रागिब, डॉ नासिरुद्दीन, मुफ्ती जुबैर बेग, मुफ्ती सय्यद शाकीर, मौलवी शोएब, मास्टर युसुफ खान, मास्टर एजाज, मास्टर रिजवान, मास्तर अस्लम खान, खादिम मोहम्मद सुफयान , आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment