न.पं. अभियंता आणि पाणीपुरवठा कंत्राटदार यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका.....अब्दुल समद शेख हबीब यांची बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
न.पं. अभियंता आणि पाणीपुरवठा कंत्राटदार यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका
अब्दुल समद शेख हबीब यांची बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : वर्षभरापासून मार्गीटाकळी शहरातील पाणीपुरवठा ये काम सुरू आहे सदर पाणी पुरवठ्याचे काम करण्याकरिता बांगले रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली परंतु सदर सतते व्यवस्थित करण्यात आले नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावे लागत आहे.
सदर बाबीची जानीव लक्षात घेता बार्शिटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ता अब्दुल समद रोख हबीब यांनी संबंधित दोषीविरुद्ध कारवाई करण्याकरिता बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये लेखी निवेदन दिले आहे सदर निवेदना मध्ये असे नमूद आहे की बार्शिटाकळी पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाणी पुरवठा योजना ची कामे अकोला येथील शाम माहोरे नामक कंत्राटदारांला पाणी पुरवठा योजना ची कामे नगर पंचायतने दिली बार्शिटाकळी शहरात पाणी पुरवठा योजना ची पाईप लाईन टाकण्या साठी जेशिबी मशीन द्वारे सदर रोडचे खोदकाम करून पाण्याचे पाईप लाईन टाकण्या साठी सदर ठेकेदारला सांगितले होते.
परंतु पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी जे सी बी मशीन ने रोड चे खोद काम करण्यात आले त्या मध्ये लाखों रुपये किंमती चे नवीन बांधलेले रोड जे सी बी मशीन ने खोदकाम करून सदर रोडचु दयनीय अवस्था झाली आहे रोडचे खोद काम करुन पाण्याची पाईप लाईन टाकून रोड चे ताबडतोब जैसे थे दुरुस्ती करून देण्याचे आदेश नगर पंचायत प्रशासनाने संबंधित पाणी पुरवठा ठेकेदारांना सांगितले होते रोड खोदकाम करून पाणी पुरवठा योजना पाईप लाईन टाकण्या साठी एका वर्षा चा कालावधी पूर्ण झाला तरी पण पाणी पुरवठा ठेकेदारांनी शहरातील खोदलेल्या एका ही रोडची दुरूस्ती करुन दिली नाही ग्रीन कालनी मध्य असलेल्या एस एस किराणा शापी ते ज्यूबली इंग्लिश स्कूलपर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी रोडचे खोदकाम झाले होते परंतु नगर पंचायत मुख्याधिकारी व अभियंता योगेश तायडे पाणी पुरवठा ठेकेदार यांचे आर्थिक संगनमताने आज पर्यंत रोड दुरुस्ती न झाल्याने परिसरातील नागरिकांना आणी शाळेतील मुलांना येणे जाणे करण्या साठी खुप त्रास सहन करावा लागतो शाळेतील लहान मुले महिला वयोवृद्ध नागरीक रात्री बेरात्री त्या खोदलेल्या खड्ड्या मध्ये पडत असून अनेकांना दुखापत झाली आहे शाळकरी लहान मुलांची आटो रिक्षा सुध्दा पलटी झाली आहे परंतु या बाबत समाज सेवक अबदुल समद शेख बार्शिटाकळी यांनी अनेक वेळा नगर पंचायत मुख्याधिकारी आणी ठेकेदार विशेष म्हणजे अभियंता योगेश तायडे यांना सदर रोड दुरुस्ती करण्याची मागणी केली असता या मध्ये कोणी ही दखल घेण्यास तैयार नाही याबाबत बार्शिटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ता अब्दुल समद शेख हबीब यांनी या बाबत बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार देऊन संबंधित यांच्या वर कार्यवाहीची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment