बार्शिटाकळी तालुका ''जमीअत ए उल्मा" च्या सौजन्याने "उल्मा व हुफ्फाझ" ची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न!
बार्शिटाकळी तालुका ''जमीअत ए उल्मा" च्या सौजन्याने "उल्मा व हुफ्फाझ" ची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न!
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुका जमीअत ए उल्मा च्या सौजन्याने स्थानिक मस्जिद रहमत इंदिरा नगर येथे तालुक्यातील उल्मा व हुफ्फाझ ची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जमीअत ए उल्मा चे जिल्हा अध्यक्ष मौलाना सय्यद वसी ऊल्लाह हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठण ने करण्यात आली नंतर नात शरीफ सादर करण्यात आली. प्रथम जमीअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम यांनी मेंबर साजी मोहीम तिर्व करून येत्या 31 जुलै पर्यंत शंभर टक्के नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.जिल्हा अध्यक्ष मौलाना सय्यद वसी ऊल्लाह यांनी मेंबर साजी व दिनी मकातिब (लहान मुलांचा मदरसा) या बाबत सखोल माहिती दिली.
सदर एक दिवसीय कार्यशाळा मध्ये जमीअत ए उल्मा चे तालुका सचिव हाजी सय्यद आशिक, शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान,मोहम्मद सलीम महक,मोहम्मद शकील कुरैशी,हाजी मोहम्मद रफीक सेठ,मौलाना एजाज, मौलाना अजीज उल्लाह खान,हाजी सय्यद रागिब,हाजी सय्यद रफीक,हाजी सय्यद इरफान पहलवान, मास्टर युसुफ खान, मास्तर आरिफ, मास्तर रिजवान, डॉ नासीरोद्दीन काजी,आदी सह तालुका व शहरातील उल्मा,हुफ्फाझ व जमीअत ए उल्मा चे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंदिरा नगर परिसरातील मास्टर सय्यद सादिक, मास्तर अस्लम खान,सय्यद सखावत अली, शेख असद,शेख अकरमा, नजाकत खान,सय्यद बिलाल,सय्यद अन्सार, शेख मुख्तार,सय्यद मोहित,शेख मोईन,सय्यद सोहेल,शेख नासिर, अब्दुल जमील, जबी ऊल्लाह खान आदींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment