आरोग्य शिबिराला वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांची भेट....बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
आरोग्य शिबिराला वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांची भेट....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी, दि. २१: रविवार २० जुलै २५ रोजी आयोजन करण्यात आलेल्या शिबिरामध्ये अकोल्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. ३०० नागरिकांनी या शिविराचा लाभ घेतला.
शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अमोल जामनिक यांनी केले. या शिबिराला उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे हे होते तर सोबत बार्शिटाकळी तालुक्याचे कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते नईमुद्दीन शेख, तमिज खान ऊर्फ गोबा सेठ, शुद्धोधन इंगळे, सुरेश जामनिक, अनिल धुरंधर, शहर अध्यक्ष अजहर पठाण, दिनेश मानकर, भास्कर सरदार, दादाराव जामनिक, गणेश गवई, बॉबी जालनिक, नागेश कांबळे, अविनाश चक्रनारायण, मिलिंद करवते, सुरज इंगळे, रक्षक जाधव, शीलवंत ढोले, वकील जामनिक, अमोल वकील जामनिक, अरविंद जामनिक, गिरधर राठोड समवेत अनेक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment