जन सुरक्षा विधेयक विरोधात कांग्रेस आक्रमक.... 👉तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन....

जन सुरक्षा विधेयक विरोधात कांग्रेस आक्रमक....
तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : -महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जन सुरक्षा विधेयक विधान मंडळात मांडले आहे. हे विधेयक नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गंभीर धोका पोहोचवणारे आहे. अस म्हणत ज़िला व तालुका काँग्रेस कमेटी च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीदार यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल यांना निवेदन पाठवले आहे. निवेदनात पुढे सांगण्यात आले आहे की, हे विधेयक एक प्रकारे लोकशाहीवर घाला आहे तसेच राज्यात राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक साधन बनु शकते. या विधेयकामुळे नागरिकांच्या व्यक्त होण्याच्या, संघटित होण्याच्या आणि निषेध करण्याच्या नैसर्गिक अधिकारावर गदा येईल. हे विधेयक रद्द करावे अशी मांगणी निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी कांग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष अशोक अमानकर, तालुका अध्यक्ष रमेश बेटकर, शहर अध्यक्ष सै. फारूख, माजी नगराध्यक्ष मेहफुज खान, भारत बोबडे, आलमगीर खान, माजी नगर सेवक सै. जहांगीर, कार्यध्यक्ष शेख अज़हर, ॲड. भुषण गायकवाड, डॉ. सै. तनवीर जमाल, अनिस इकबाल, मासुन खान,असं. अतिक , असद खान, अन्सार खान, शुभम राजुरकर, नितेश वाघमारे, सै. असद अली, सोहेल खान, मो. शोएब, जनु लीडर, इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....