कारगिल विजय दिनानिमित्त अकोल्यात अश्रूंनी ओथंबलेला सन्मान सोहळा....... 👉भर पावसात शहिदांच्या सन्मानात रॅली काढणारी एकमेव देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्था अकोला. 👉हुतात्मा स्मारकात जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहिदांना सामूहिक मानवंदना; वीर परिवारांचा आळंदा राजयोग मंगल कार्यालय येथे सन्मान....
कारगिल विजय दिनानिमित्त अकोल्यात अश्रूंनी ओथंबलेला सन्मान सोहळा
👉भर पावसात शहिदांच्या सन्मानात रॅली काढणारी एकमेव देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्था अकोला
👉हुतात्मा स्मारकात जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहिदांना सामूहिक मानवंदना; वीर परिवारांचा आळंदा राजयोग मंगल कार्यालय येथे सन्मान
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी , दि. २६ : कारगिल युद्धातील बलिदानी जवानांच्या स्मरणार्थ, अकोल्यात झालेला कारगिल विजय दिन साजरा करताना शहिदांच्या त्यागास अकोलावासीयांनी अश्रूंनी ओथंबलेली मानवंदना अर्पण केली. शहिदांसाठी व शहिदांच्या परिवारांसाठी , व सैनिकांसाठी झटणारी व उपक्रम राबवणारी संस्था,
देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्था अकोला हुतात्मा स्मारक येथे झालेल्या श्रद्धांजली सोहळ्याला जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या ५२७ जवानांसह अकोल्यातील सर्व वीर शहिदांना मानाचा मुजरा करत, उपस्थितांनी सामूहिकरित्या श्रद्धांजली अर्पण केली देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ मनोहर गोकुळ चव्हाण, उपाध्यक्ष.सुभेदार अर्जुन बुधनेर, सचिव ,श्रीकृष्ण काशीराम आखरे,मेजर दीपक गाडगे, मेजर विठ्ठल इंगळे, मेजर राज वानखडे, मेजर दिनेश राठोड, मेजर किशन गावंडे मेजर धम्मा मोहड मेजर प्रकाश राठोड, मेजर लक्ष्मण जाधव, मेजर गोपाल पवार, मेजर सुनील पिंपळे, मेजर विलास रोंदळे मेजर मंगेश घाटोळ मेजर प्रवीण अंभोरे,शहीद पुत्र दीपक पातोंड, व सर्व आजी-माजी सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथून, भर पावसात वीर जवानांच्या सन्मानार्थ सैनिकांच्या मोटरसायकल रॅलीला ECHS अधिकारी कर्नल शर्मा साहेब, यांनी हिरवा झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली. रॅलीत सर्व सैनिक परिवारासह भर पावसात अंदाजे 350 सैनिकांनी सहभाग घेतला
ही रॅली आळंदा येथे पोहोचल्यावर जिल्ह्यातील शहीद कुटुंबीयांचा – वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, वीरपुत्र अशा सर्वांचा सन्मान करण्यात आला डॉ. मनोहर गोकुळ चव्हाण, सुभेदार मेजर अर्जुन बुधनेर, डॉ सुगोद वाघमारे आणि सरपंच सौ कोमल दीपक पतोंड , सामाजिक कार्यकर्ते काशीराम आखरे व जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक व सैनिक परिवार यांची उपस्थिती लाभली.
दरवर्षी अकोल्यात कारगिल विजय दिन साजरा करत शहिदांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे.
या प्रसंगी कारगिल विजय दिन ही केवळ आठवण नव्हे, तर शहिदांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देण्याची प्रेरणा असल्याचा निर्धार उपस्थितांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसून येत होता.
कारगिल विजय दिनानिमित्त अकोल्यात शहिदांना अश्रुपूरित अभिवादन
आळंदा येथे देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्था व तीक्ष्णगत वेल्फेअर सोसायटीतर्फे झालेला वीर शहीद सन्मान सोहळा भावनिक ठरला. माजी सैनिक डॉ मनोहर गोकुळ चव्हाण व डॉ सुगत वाघमारे, सरपंच कोमल दिपक पातोंड यांच्या पुढाकाराने अकोला जिल्ह्यातील ३७ शहीद कुटुंबांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिकांचे गौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात अकोलावासीयांनी अश्रूंनी ओथंबलेली श्रद्धांजली अर्पण करत वीरांच्या स्मृती जपल्या.
Comments
Post a Comment