संताजी सेना शंभू सेनेच्या वतीने शिवभक्तांना सत्कार.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
संताजी सेना शंभू सेनेच्या वतीने शिवभक्तांना सत्कार.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बार्शीटाकळी शहराचे आराध्य दैवत श्री खोलेश्वर महादेव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा अनेक कावड मंडळींनी जलाभिषेक केला त्यानिमित्त शहरातील स्थानिक संताजी नगर, तेलीपुरा येथे आलेल्या सर्व कावड मंडळांचे व शिवभक्तांचे शंभू सेना व संताजी सेना तालुका अध्यक्ष सचिन आगाशे यांच्या नेतृत्वात शाल श्रीफळ आणि पवित्र धर्मग्रंथ श्रीमद् भगवद्गीता देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती संताजी सेना संस्थापक अध्यक्ष प्रमोद देंडवे, भारत बोबडे यांच्या शुभहस्ते मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी स्वीकारणारे पोलिस कर्मचारी यांचासुद्दा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी शेषराव राजुरकर, रामेश्वर नानोटे पाटील, अनंत केदारे, प्रकाश माणिकराव, श्याम ठक, दिपक कळसाईत, अमोल केदारे, सचिन राजुरकर, दिनेश रत्नपारखी, अमोल जमानिक, मारोती भगत, गजानन गर्दे, नितेश वाघामारे, बबन ढेंगळे, गजानन भुजाडे, लक्ष्मण वाघमारे, शुभम राजुरकर, अमोल अग्रवाल, शैलेश ढेंगळे, जंगबहाद्दूर सिंग ठाकूर, विलास कापकर, विशाल भुजाडे, अंकुश पिंजरकर, बाळू कुरोडे, मंगेश कळंब, गणेश वाघमारे, ओमप्रकाश उखळकर, राजू आगाशे, उपस्थीत होते.
Comments
Post a Comment