धाबा ते लोहगड रस्त्याचे थांबलेले काम त्वरित सुरु न केल्यास समनक जनता पार्टीचा आदोलनाचा इशारा.... 👉शाळकरी विद्यार्थी त्रस्त प्रशासन मस्त!

धाबा ते लोहगड रस्त्याचे थांबलेले काम त्वरित सुरु न केल्यास समनक जनता पार्टीचा आदोलनाचा इशारा.... 
👉शाळकरी विद्यार्थी त्रस्त प्रशासन मस्त!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुक्यातील धाबा ते लोहगड रोड मधील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रवास अक्षरशः जीवघेणा झाला आहे, रखडलेले काम सात दिवसाच्या आत सुरू न केल्यास समनक जनता पार्टी बार्शिटाकळीचे तालुका अध्यक्ष अतिश राठोड यांनी आज बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन देतांना आव्हान केले. धाबा या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दवाखान्यात जाण्यासाठी गरोदर महीला, शाळकरी विद्यार्थी यांना येण्यासाठी कष्ट भोगावे लागत आहे, रोड आहे की गड्डे आहे ते राहलेच नाही करीता प्रतिलिपी जिल्हाधिकारी अकोला, कार्यकारी अभियंता अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना निवेदन व्दारे कळवीण्यात येत की येत्या सात दिवसात धाबा महान रोडचे काम सुरू न झाल्यास प्रा संदेश चव्हाण समनक जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, प्रा डॉ अनिल राठोड समनक जनता पार्टी महासचिव, प्रदेश अध्यक्ष कालपाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल बार्शिटाकळी समनक जनता अध्यक्ष अतिश राठोड, कुलदीप चव्हाण, शिवराज जाधव, दिनेश सोळंके, भुषण राठोड, गिरधर राठोड, गणेश खराटे, सुनिल जाधव, प्रविण राठोड, जिवन जाधव, अजय राठोड, निलरत्न सरकटे, निलेश चव्हाण, रोहीत चव्हाण, विक्रम जाधव, विशाल चव्हाण, अभय सरकटे यांनी निवेदन व्दारे आव्हान केले आहे 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....