मुलभूत सोयी सुविधा मिळण्याकरिता एकता नगर वाशियांचे पालकमंत्री व मुख्याधिकारी यांना साकडे.....

मुलभूत सोयी सुविधा मिळण्याकरिता एकता नगर वाशियांचे  पालकमंत्री व मुख्याधिकारी यांना साकडे
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : नगरपंचायत बार्शिटाकळी मधील वार्ड क्रमांक २ च्या समस्त एकता नगर वासीयांची अकोला जिल्ह्यांचे पालकमंत्री व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना आज दिनांक ८ जुलै रोजी अर्ज सादर केला त्या अर्जा मध्ये त्यांनी असे म्हटले आहे की एकता नगर मध्ये जसे लेआउट झाले तेव्हापासुन येथे रस्ता झाला नाही व या वस्ती मध्ये भौतीक सोई सुविधाचा अभाव असल्यामुळे समस्त एकता नगर मधील रहवासी नागरीक त्रस्त झालो आहोत. यापुर्वी देखील ऐथील नागरीकांनी आपणास विनंती अर्ज दिलेले आहेत. तसेच तक्रारी केल्या आहेत यावर अद्याप पर्यंत काहीच काम झाले नाही, सर्वात जास्त त्रास हा पावसाळयामध्ये होतो आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. या ठिकाणी सहज चालत जाणे शक्य नाही तसेच दुचाकी घरापर्यंत जात नाही, या कारणामुळे दुचाकी चोरीला जात आहेत संपुर्ण खाली जागे मध्ये गवत पसरले आहे. यामध्ये दर दिवशी साप विंचु निघत आहेत यामुळे नागरीक भयभित झाले आहेत. सर्वत्र चिखल व घाणिचे साम्राज्य निर्माण झाले आहे यासर्व बाबीचे गांभिर्य लक्षात घेवुन याबाबत तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
 आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत मग लोकशा हेही प्रधान देशात हा भेदभाव का हा सवाल या एकता नगरातील प्रत्येक रहवासीयांचा आहे येथे रस्ते नाहीत, घरगुती सांडपाण्याच्या नाल्या नाहीत तसेच कचरा व्यवस्थापणाची सोय नाही. रस्यावरील खांबावर लाईट नाहीत या सर्व मुलभुत सोई सुविधा पासुन एकतानगर तहसील मागील भाग वंचित ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रश्ना बाबत आपण विषेश लक्ष देवून यावर योग्य ती कायमस्वरुपी उपाय योजना कराव्यात अशा प्रकारचे निवेदन एकता नगर मधील निलु सराटे, मंगला केशव वाघमारे, योगेश कुरशेंगे, आम्रपाली विजय कांबळे, अनिल‌ गडलिंग, रेखा कैलास डोके, अमोल शेषराव जाधव, सौ नंदीता रविंद्र जामनिक, जयश्री निखाडे ,राजु सरकटे, देवेंद्र जामनिक, बाळु वरठे, बबन खंडारे, सुभाष निखाडे, देवेंद्र जामनिक, प्रतिक्षा बाठे, पंकज जाधव, मंगला हिवराळे, 
श्रीकृष्ण हिवरा‌ळे ,सतिश कृष्णराव हिवराळे व एकता नगर मधील नागरिक उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे