महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन

महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : शासन निर्णयानुसार महसूल
विभागाकडुन देण्यात येणा-या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभदेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दीगंत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निदेर्शान्वये व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार राजेश वझीरे, बार्शिटाकळी व तहसिल कार्यालय, बार्शिटाकळी येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व तालुक्यातील इतर विविध विभाग यांच्या सहकायार्ने दि.०१ ते ०७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह - २०२५ साजरा करण्यात येणार असुन पुढील प्रमाणे तारीख निहाय तसेच विविध विभागांचे अधिकारी औपचारिक उद्घाटन होणार असून आहेत. १) ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येईल तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण होईल २) ऑगस्ट रोजी २००९ पूर्वीपासून धान्याभूमिहीन पट्टे वाटप करण्यात येईल आणि अतिरिक्त जागेचे वितरण करण्यात येईल ३) ऑगस्टला पाणी 
व शिवरस्ता योजना लाभार्थ्यांचे अनुभव कथन संवाद सत्र होईल.४) ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत मंडळस्तर संवाद व साजरे पण होईल 
५ )ऑगस्टला विशेष सहाय योजने अंतर्गत डेबिट न झालेल्या लाभार्थ्यांना तातडीने मदत दिली जाईल. ६) ऑगस्टला जमीन अभिलेख अद्ययावत करणे, ऑनलाइन ७/१२ वितरण व नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले जाईल. ७) ऑगस्ट रोजी MSand धोरणाबाबत मार्गदर्शन, नविन मानक , SOP प्रमाणे अंमलबजावणी आणि महसूल सत्पाह समारोप साजरा केला जाईल. तहसीलदार राजेश वझीरे तसेब महसूल विभागाकडून सर्व नागरिकांना उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे जेणेकरून अधिकाधिक लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल.


Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....