भोलेनाथाचा कावड महोत्सव! पहिल्याच सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी.. कावड़ यात्रेत आकर्षक देखावे, ढोल ताशांचा समावेश.

भोलेनाथाचा कावड महोत्सव!

पहिल्याच सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी

कावड़ यात्रेत आकर्षक देखावे, ढोल ताशांचा समावेश..
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तालुक्यातील विविध गावातील विष मंदिरात हजारो भाकांनी वर्मानासाठी गर्दी केली होती तसेच अनेक शिवभक्तांनी कावड़ यात्रा काढून महादेवला जलाभिषेक केला आहे यावेळी आकर्षक देखाचे व ढोल तासांच्या गजरात कावधारी मंदिरात येत होते.
२८ जुलैला श्रावण महिन्यातीत पहिला सोमवार असल्याने तालुक्यातील बार्शिटाकळी, महान व दोनद, शिंदखेड , या गावातील मिरवणूक रस्त्यावरून विविध नद्यांच्या जतांची कावड घेऊन हजारो शिवभकांनी विविध प्रकारचे आकर्षक देखाने, स्युिदय सम्राट तथा थोर महापुरुर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमांचा समावेश असलेल्या कावडी घेऊन डोल ताशांचा गजर अन शिवशंकराचा जयजयकार करीत मिरवणूक काढण्यात आली. या तिन्ही गावाप्रमाणेच तालुक्यातील अनेक गावातील शिवालयावर विधिवत पूजन करून हर हर बोला महादेव भोले शंकरा रे भोले शंकरा, अशा प्रकारचा जयजयकार करत जलाभिषेक करून दर्शनाचा लाभघेतला सबर मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी शंकरजीच्या प्रतिमेचे पूजन करुन मिरवणुकीतील कार्यकर्त्यांचा सन्मान केला अनेकांनी मिरवणुकीतील भक्तांना व जनतेला पाण्याची ठिकठिकाणी विनामूल्य व्यवस्था केली तर अनेक मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त शास्त्र वाचन तथा रात्रीच्या सुमारास हरिभजन यांचे कार्यक्रम पार यहत आहेत, विशेष म्हणजे शेतकन्यांचे आराध्य दैवत तथा भोलेनाथाचे वान बैल यांना विविध शिवालयात दर्शनाला आणून त्यांचे पूजन करून मंदिराला प्रदक्षिनाही घातल्या 

कावड यात्रेतील भक्तांचा सन्मान

सोमवारला सकाळी ६. २० वाजताच्या सुमारास बार्शिटाकळी येथील खोलेश्वर शिवालयात याभागाचे आ. हरीश पिंपळे यांनी विधिवत पूजन व जलाभिषेक केला. त्यानंतर कावडीचे पूजन करून शिवभक्तांचा सन्मान केल्यानंतर कावड महीपावाची सुरुवात झाली. यावेळी अनेका जण उपस्थित होते. बार्शिटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रठीण धुमाळ व निज़र पोलिस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांच्या सहकान्यांनी चोख बंदोबस्त ठेवला सदर महोत्सव शांततेत मार पहला

जि.प., पं.स. निवडणूक आरक्षण केव्हा निघणार!

बार्शिटाकळी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणाची प्रतीक्षा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना व पुढाऱ्यांना लागली आहे. मात्र सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना याचे काही देणे घेणे लागत नसल्याची स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माहिती असलेली यादी निवडणूक विभागाने जाहीर केली असून, बार्शिटाकळी तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात व पंचायत समितीचे गण-गटाची १४ गण आहेत. सदर निवडणुका सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा  ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विविध पक्षाने या निवडणुकीच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या  कार्यकर्त्यांच्या बैठका व चर्चासत्र होत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण केव्हा निघणार आहे, याकडे राजकीय लोकांचे लक्ष वेधले आहे. या आरक्षणानंतरच निवडणुकीच्या कामाला वेग येऊ शकतो.

तसे पाहिले तर राजकारण हे समाजकारण व विकासाचे माध्यम परंतु गेल्या १०-१५ वर्षांपासून राजकारणात ठेकेदारी व भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्य जनता यांची विकासकामे कमी होऊन काही प्रामाणिक निवडलेले प्रतिनिधी वगळले तर अनेकांनी आपण कसा पैसा कामाऊ शकतो. याकडे जास्त लक्ष केंद्रित केल्याच्या चर्चा तालुक्यातील अनेक गावातील जनता करीत आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता नवीन चेहन्यांनाच संधी मिळण्याचे शक्यता निर्माण झाली असली तरी पूर्वीचे काही जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ शकतात, असेही बोलले जाते.

सद्यस्थितीला  शेतकऱ्यांना कर्जमाफीची तसेच गत काळात पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईचा पीक विमा व शासकीय मदत मिळाली नाही. तसेच तालुक्यातील शेती ही वरच्या पावसावर आधारित असल्याने अनेक शेतकऱ्याऱ्यांवर विविध प्रकारच्या राष्ट्रीय बैंका, सहकारी बैंका, व्यापारी बैंका व पतसंस्थेकडून काढलेल्या कर्जाची परतफेड झाठी नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक लढणारे व्यक्ती जोमात असले तरी शेतकरी मात्र कोमाल गेला आहे. जनतेला तर सद्यस्थितीला राष्ट्रीय लोकांचा वीट आल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत.

एसटीच्या चालक-वाहकाने महिलेची बॅग केली परत
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुक्यातील महान येथील एसटी वाहक
मो. सुलतान व चालक शहजाद या दोघांनी कर्तव्यावर आपली जबाबदारी दाखवत एका महिलेची बंग परत केली आहे. मंगरूळपीर ते नंदुरबार कर्तव्य करीत असताना खामगाव येथे पोहोचल्यानंतर गाडीमध्ये खूप गर्दी असल्यामुळे प्रवासी बसमध्ये चढले; परंतु काही जागेअभावी एक महिला खामगावलाच उतरून गेली, त्यामुळे या महिलेची एक पर्स (बॅग) गाडीमध्ये विसरून राहिली. राहिलेल्या पर्सकडे कुणाचेही लक्ष नसतानाही वाहक सुलतान यांनी ती पर्स कुणाची आहे ? म्हणून बसमध्ये चौकशी केली असता कुणीही माझी आहे म्हणून म्हटले नाही. काही वेळानंतर त्ती चंग ज्या महिलेची होती, त्या महिलेने चौकशी करून सुलतान यांचा मोबाइल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधून मी मागच्या गाडीमध्ये वेत आहे त्यामुळे माझी पर्स (बॅग) सुरक्षित आपल्याकडे ठेवा मी म्हणून कळविले आणि ती पर्समध्ये मौल्यवान वस्तू दागिने, रोख रक्कम विस हजार रुपये तसेच मोबाइल आहे, म्हणून सांगितले त्यांनी ती पर्स (बॅग) सुरक्षित जवळ ठेवून मुसावळला वाहतूक नियंत्रक यांच्या समक्ष त्यांना परत दिली, त्यामुळे प्रवाशी महीलाने चालाक शहबाद वाहक सुलतान यांचे आभार मानले. आजही वाहक हा आपली जबाबदारी एक कर्तव्य, इमानदारी, माणुसकीचं नातं, म्हणून इमानदारीने कामगिरी करत असतो प्रवासी देवत समजून प्रवाशांचा असलेला एसटी कर्मचाऱ्यावरील विश्वास चालक व वाहकांनी आपल्या कामगिरीतून सार्थ ठरत असतो प्रवाशांच्या विश्वासाला एस.टी. कर्मचारी हा तडा जाऊ देणार नाही याचे उत्तम है उदाहरण आहे. त्यानिमित शहजाद व सुलतान यांचे मंगरूळपीर आगारातुन कौतुक होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....