श्रीमती राधाताई तुकारामजी बिडकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती...

श्रीमती राधाताई तुकारामजी बिडकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी श्रीमती राधाताई तुकारामजी बिडकर यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलजी पटेल यांच्या अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी श्रीमती राधाताई बिडकर यांनी प्रयत्नशील रहावे पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाला वाढीसाठी प्रयत्न करावे असे उद्गार यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली ताई चाकणकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसणे, समता परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे समता परिषदेचे बार्शिटाकळी शहराध्यक्ष चक्रधर राऊत, यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, नरिमन पॉईट मुंबई येथे देण्यात आले यावेळी श्रीमती राधाताई बिडकर यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ तथा अकोला विधान परिषदेचे आमदार अमोल दादा मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा , महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभाताई अवचार यांना दिले. जिल्ह्यात व महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहील असे म्हटले. अशी माहिती अनिल मालगे यांनी दिली


पिंजर ठाणेदार यांचा वादग्रस्त पोलीस 'कॉन्स्टेबल डोंगरे विरुद्धचा डिफॉल्ट' एसपीच्या दालनात
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल कुणाल डोंगरे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याने पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे डिफॉल्ट सादर करणार असल्याची माहिती ठाणेदार यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
पोलीस कर्तव्यावर असताना दारू पिणे आणि लोकांना पैशासाठी धमकावणे, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे, गावातील व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांशी या पोलीस कर्मचाऱ्यांचे असभ्यवर्तन आहे, असा ठपका नागरिकांनी ठेवला या पोलीस कर्मचाऱ्यांना आहे, पिंजरचे ठाणेदार दराडे यांचे कडून 'पाठबळ' मिळत असल्याचाही आरोप देखील ग्रामस्थांनी तक्रारीतून केला आहे, असे सर्व लोकांचे म्हणणे आहे, पोलिसांकडून नेहमी न्यायाची अपेक्षा केली जात, काही पोलिसांनी आपल्या देशासाठी जीवावर उदारहून कार्य केले आहे, पोलीस यंत्रणा आहे म्हणून हे जग सुरक्षित आहे, हेही आम्ही मान्य करतो, परंतु बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याकडून चांगली वागणूक मिळत नसल्याने सर्व ग्रामस्थांनी १४ जुलै रोजी सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या कार्यालयात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे, तक्रारीच्या आधारे आणि संतप्त झालेल्या जनतेकडून मिळालेल्या माहितीनुसार वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित करण्यात आली होते.

१५ जुलै रोजी वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्या विरोधात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रचंड खळबळ वाजली आहे. वृत्तपत्रातील बातम्या पाहून सर्वसामान्य जनतेला आता तरी आपल्याला न्याय मिळेल, या पोलीस कर्मचाऱ्यांची येथून हकालपट्टी होईल, असा विश्वास वाटत आहे, दिनांक १५ जुलै रोजी ठाणेदार दराडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आज डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल बाबत आज डिफॉल्ट जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे, सदर डिफॉल्ट मध्ये काय असणार आहे? याबाबत आमचे तालुका प्रतिनिधी यांनी विचारणा केली असता, त्यांनी गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारी नुसार, आणि त्यांचे दारू पिऊन असभ्य वर्तन असल्याचा उल्लेख सुद्धा या डिफॉल्ट मध्ये असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, त्यामुळे शिस्तप्रिय आणि ऑपरेशन प्रहार कडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणारे सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक या डिफॉल्ट मध्ये काय निर्णय देतील, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे यावर ची प्रतिक्रियाही हे नंतर पहावयास मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे