बार्शिटाकळी पोलिसांची कारवाई 2 तलवारीसह आरोपी अटकेत...
बार्शिटाकळी पोलिसांची कारवाई 2 तलवारीसह आरोपी अटकेत...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक सर यांनी अवैध धंद्याविरुध्द ऑपरेशन प्रहार मोहीम संपूर्ण अकोला जिल्ह्यात सुरू असून आज पोलीस स्टेशन बार्शिटाकळी हद्दीत एक इसम 2 धारदार तलवार जवळ बाळगत आहे अशा खात्रीलायक बातमी वरुण पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथील PSI सुहास गोसावी, ASI फराज शेख, पो हे कॉ. राजेश जोंधाळकर , पो. शि. अमोल हाके, पो शि सुम्मैया मोहम्मद यांनी इंदिरा आवास बार्शिटाकळी येथे छापा मारला असता आरोपी रईस खान रफिक खान वय 50 वर्षे याचे ताब्यात 2 धारदार तलवारी मिळून आल्याने त्या जप्त करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री बी.चंद्रकांत रेड्डी साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ पो स्टे बार्शिटाकळी यांचे मार्गदर्शनात पो स्टे बार्शिटाकळी येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली
Comments
Post a Comment