ऑपरेशन प्रहारअंतर्गत बार्शिटाकळी पोलिसांची कारवाई कोथळी बु. येथे गावठी दारूचा गुत्ता उद्ध्वस्त – 39,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन प्रहारअंतर्गत बार्शिटाकळी पोलिसांची कारवाई
कोथळी बु. येथे गावठी दारूचा गुत्ता उद्ध्वस्त – 39,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : अवैध दारूच्या धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत बार्शिटाकळी पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई केली. ग्राम कोथळी बु. येथे करण्यात आलेल्या रेडमध्ये 39,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अजय भीमराव वरठे (वय 40, रा. कोथळी बु.) याच्या कबज्यातून 210 लिटर सडवा मोहा (किंमत 31,500 रुपये) व 40 लिटर हातभट्टी दारू (किंमत 8,000 रुपये) असा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये PSI बोडखे, GPSI दशरथ बोरकर, HC गोकुळ चव्हाण, PC अन्सार (ब. नं.1378), PC स्वप्नील (ब. नं.30) व चालक पो.का. मनीष ठाकरे (ब. नं.943) यांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे