'महसूल सप्ताह' निमित्त पहिल्या दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून महसूल दिवस साजरा...
'महसूल सप्ताह' निमित्त पहिल्या दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून महसूल दिवस साजरा...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- शासन निर्णयानुसार महसूल विभागाकडुन देण्यात येणा-या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ देता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दीगंत व्हावा, यासाठी दि 01 ते 07 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत 01/08/2025 रोजी पहिल्या दिवशी महसूल दिनानिमित्त तहसिल कार्यालय, बार्शिटाकळी येथे नागरिकांना दैनंदिनी रित्या निर्गमित करण्यात येणारे दाखल्यापैकी काही विद्यार्थी, जेष्ठ नागरीक व इतर लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र तहसिलदार, बार्शिटाकळी यांचे हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये उत्पन्न चा दाखला-183, अधिवास दाखला-13, रहिवास दाखला- 17, इतर दाखले-73 असे एकूण 286 दाखले निर्गमित करण्यात आले.
त्यासोबत सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णयानूसार सेवा निवृत्त कर्मचारी यांनी धारण करावयाचे ओळख पत्र देवून गौरविण्यात आले.आणि मागिल महसूली वर्षात तहसिल कार्यालय अंतर्गत उकृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये श्री.अक्षय नागे नायब तहसिलदार, श्री.संतोष कर्णेवार,मंडळ अधिकारी राजंदा श्रीमती.वंदना वानखडे सहायक महसूल अधिकारी, श्री.अविनाश खोरणे महसूल सहायक, श्रीमती.संगिता दराडे ग्राम महसूल अधिकारी, पुनोती बु., श्री.गणेश माहोकार वाहन चालक, श्री.विष्णू राऊत शिपाई, श्री.महेंद्र भुयार, महसूल सेवक यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सेतू संचालक, यांनी त्याच्या मनोगतांव्दारे तहसिल कार्यालय, बार्शिटाकळी चे कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्य स्थानी श्री.राजेश वझीरे तहसिलदार, बार्शिटाकळी उपस्थित होते. तहसिल कार्यालयातील श्री.अक्षय नागे, नायब तहसिलदार (महसुल), श्री.ए.डी.म्हात्रे, नायब तहसिलदार (सं.गा.यो.) श्री.आनंद गुप्ता (पुरवठा निरीक्षक) सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री.अतुल सोनवणे, निवासी नायब तहसिलदार, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.विशाल काटोले, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले. कार्यक्रामचे सर्व व्यवस्था अमोल बेलखेडे, ना.नाझर यांनी पाहिली. तालुक्यातील सेतू संचालक, पत्रकार बंधु व नागरीक उपस्थित होते.
उद्या दिनांक 2 ऑगस्ट रोजी मौजे पिंजर येथे तहसील कार्यालय व पंचायत समिती बार्शिटाकळी यांचे संयुक्त विद्यमानाने निवासी जागांचे 2011 पूर्वी अतिक्रमण असलेल्या 113 कुटुंबाचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना पट्टेवाटप / नमुना 8 वाटप मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, जि प अकोला यांचे हस्ते होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, नागरीक यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महसूल विभाग, बार्शिटाकळी मार्फत करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment