बार्शिटाकळी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नगरपंचायत समोर उपोषणाचा इशारा...
बार्शिटाकळी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नगरपंचायत समोर उपोषणाचा इशारा...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी शहरात गेल्या दोन वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू असुन नगरपंचायत कुभकर्णी झोपेत असुन या मोकाट कुत्र्यांमुळे दोन महिन्यांपूर्वी एका शिक्षकाचा अपघात झाला होता सुदैवाने त्या शिक्षकाला मुका मार व हात फॉक्चर झाला होता
दिवसेंदिवस या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून या कुत्र्यांमुळे शाळकरी मुले मुली तसेच बकऱ्याचा जीव धोक्यात आहे नगरपंचायत ने या मोकाट कुत्र्यांचा १० दिवसात बंदोबस्त करावा अन्यथा ११ ऑगस्ट पासून गावातील नागरिकांसह नगरपंचायत समोर उपोषणास बसण्याचा इशारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रिजवान उर्फ बाबा व गावातील तरूणानी आज नगरपचायचे मुख्याधिकारी यांना दिला आहे
यावेळी बार्शिटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रिजवान बाबा, अय्याज सेठ दयावान, मेहबूब खान, अरिफ खान, कामरान बाबा, मुमताज , मुजम्मिल, शहजाद, बिलाल, तसदीक खान हसन खान, यांच्या सह बार्शिटाकळी शहरातील नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment