जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी !
जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी !
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय नेत्या आद. प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर व प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी जि. प. समाजकल्याण सभापती सौ. आम्रपालीताई खंडारे व जिल्हा महासचिव तथा माजी जि. प. अध्यक्ष सौ. संगीताताई अवावू यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक साहेब यांना त्यांच्या शासकिय कार्यालयात राखी बांधली तसेच उप जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस बंधु व भगिनींना सुध्दा राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीकोनातून विचार करत असल्यामुळे आम्ही महिला अबला आहोत असे आम्ही मानत नाही. त्यामुळे भावांनी बहिणीचे 'रक्षण' करावे ही अपेक्षाच आणि हा विचारही आम्ही करत नाही. आताचे सरकार हे भारतीय संस्कृतीच्या नावावर मोठ्या प्रमाणात संस्कृतीचे उदात्तीकरण करते. या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आपल्या जवळील पोलीस ठाण्यात जाऊन सोमबार ११ ऑगस्ट व मंगळवार १२ ऑगस्ट रोजी पोलिसांना (महिला आणि पुरुष पोलिसांना) भगिनी भावांना राखी बांधली. आपला समाज राखी पौर्णिमा साजरा करत असला, तरी काही भाऊ हे रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनतात हेही आपण अनुभवतो. पुणे पोलीस खात्यातील कर्मचारी महिलांशी दादागिरीने वागले व त्या विरुध्द न्याय मागायला आलेल्या स्वी-पुरुष नागरिकांशी बंधुभावाने वागले नाहीत हे आपण बघितलेच आहे आणि हा आपला सर्वत्र व नेहमीचाच अनुभव आहे.
स्त्रियांच्या सन्मानाची आणि समानतेची भाषा समजत नसेल तर निदान रक्षाबंधनाची समजेल ही अपेक्षा बागळत पोलीस कर्मचाऱ्यांना स्वी पुरुष नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस भगिनी व भावांना वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हाध्यक्षा सौ आम्रपालीताई खंडारे, जिल्हा महासचिव सौ. संगीताताई अढावू, माजी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जिल्हा संघटक अनुराधाताई ठाकरे, महानगर अध्यक्षा सौ वंदनाताई वासनिक, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती सौ मायाताई नाईक, जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षीताई शेळके, जिल्हा सदस्य दुर्गाताई अवचार, ग्रा. पं. देवळी येथील माजी सरपंच सौ. वैशालीताई सदाशिव, अकोला तालुकाध्यक्ष तथा पं. स. गटनेता मंगलाताई शिरसाट, विद्याताई धाडसे, तेजस्विनी बागडे, सरोजताई वाकोडे यांच्यासह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी राख्या बांधल्या. ह्यावेळी पक्षाने प्रकाशित केलेल्या पत्राचे वाचनही जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक साहेब यांच्या समोर जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे यांनी केले व ओवाळणी म्हणून पोलिस अधिक्षक अर्चित चांडक साहेब यांनी उपस्थित सर्व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बक्षिसे दिली असता ओवाळणीत रक्षकच भक्षक होवू नये एवढीच अपेक्षाही महिला आघाडीच्या वतीने व्यक्त केली.
Comments
Post a Comment