पंचायत समिती व तहसील कार्यालय बार्शिटाकळी यांचा संयुक्त महसूल दिन सप्ताह...

पंचायत समिती व तहसील कार्यालय बार्शिटाकळी यांचा संयुक्त महसूल दिन सप्ताह
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : पंचायत समिती बार्शीटाकळी व तहसील कार्यालय बार्शीटाकळी यांचे संयुक्त विद्यमाने महसूल दिन सप्ताह निमित्त आज दिनांक 2/8/2025 रोजी ज्ञानरंजन सभागृह भाऊसाहेब लहाने जुनिअर कॉलेज पिंजर येथे अतिक्रमण नियमानुकूल करून पात्र असलेल्या 113 कुटुंबास पट्टे / नमुना नंबर 8 वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला श्रीमती अनिता मेश्राम मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य/पंचायत ) श्री. डिगांबर लोखंडे, गट विकास अधिकारी श्री. रविकांत पवार,तहसीलदार श्री. राजेश वजिरे,सरपंच सौ. शारदाताई ठक,उपसरपंच शेख वसीम शेख पिर मोहम्मद ,माजी सरपंच श्री.अशोक लोणाग्रे, गाडगे बाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख श्री.दिपक सदाफळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन मानतकर, माजी सभापती संजूभाऊ चौधरी, मा. पं.स.सदस्य जावेद खा हमीद खा, गोपालभाऊ महल्ले, संजूभाऊ इंगळे, राजूभाऊ काकड, गोवर्धन सोनटक्के,संकेत राठोड, शाहीनाथ बाबर, ग्रामपंचायत महान चे सदस्य, महान येथील उमेद च्या महिला सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्री.नवलकार व तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी भराडी, ग्राम महसूल अधिकारी, पं.स.चे विस्तार अधिकारी दिपक इंगळे, कप्रअ दिलीप सिरसाट, शाअ अनिता भगत,कअ मनस्वी ढोके,शाह हक, शिक्षण विस्तार अधिकारी जाणोरकर,उमेद चे बघेले,कॉलेज चे प्राचार्य, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी यांनी केले तर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, माजी सरपंच यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कृषी रोहिदास भोयर यांनी तर आभार प्रदर्शन ठाकरे सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करिता ग्रामपंचायत महान, जनुना व जमकेश्वर चे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवारांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....