अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला जाहीर पाठिंबा....
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला जाहीर पाठिंबा......
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- आरोग्य सेवेच्या आघाडीवर तब्बल दोन दशके लढा देणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत अधिकारी व कर्मचारी आजही कंत्राटी बेड्या घालून काम करत आहेत. १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार १० वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे ६९ संवर्गातील नियमित समायोजन तात्काळ व्हावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्टपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन आज पासुन सुरु झाले आहे.
२०२२ मध्ये मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या NHM कर्मचाऱ्यांना त्यांच्या समकक्ष पदानुसार व ज्यांचे समकक्ष नसल्यास शैक्षणिक पात्रतेनुसार थेट शासन सेवेत समायोजनाचे आदेश दिले. आदेशानंतर राज्यभर ३७ दिवसांचे संप झाले. शेवटी १४ मार्च २०२४ रोजी शासनाने ३०% मंजूर पदांवर समायोजनाचा निर्णय घेतला; पण सव्वा वर्ष उलटूनही तो कागदावरच आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण व एकता संघ समिती एन एच एम संघटना अकोला त्यांच्या वतीने १९ ऑगस्ट पासून जिल्हा अधिकारी कार्यालय समोर अकोला येथे नियमित शासन सेवेत समायोजन, बदली धोरण, वेतन वाढ, अपघात विमा इत्यादी मागणीसाठी सुरु असलेला काम बंद आंदोलनाला. महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना र.न. 3881 या संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संगीताताई जाधव यांनी आंदोलन मंडपात कृती।समितीच्या पदाधिकारी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मनोबल वाढवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले.
अशाच प्रकारे आपल्या हितासाठी अधिकारासाठी हक्कासाठी न्यायासाठी कायमस्वरूपी जिद्दीने आंदोलन सुरू ठेवा निर्णय तर राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार करण्यात येईलच.आंदोलनाच्या दरम्यान संघटना अध्यक्ष संगीता जाधव यांनी पाठिंबा आंदोलनाला जाहीर केला. यावेळी डॉ. रामनागे,मनोज कडू,गोपाल अंभोरे, उमेश ताटे, सचिन उनवणे, इमरान खान, परिमल फुके, नाना चव्हाण, डॉ. अश्विन तिवारी, तनवीर खान, महेंद्र कोलटक्के, ॲड शुभांगी खांडे, तृप्ती तायडे, स्वाती अस्वरे, डॉ. भाग्यश्री गोरटे, डॉ. सपना बाटे,.., डोळस, धुमाळे, थाठे सर, व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते,
Comments
Post a Comment