सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळाव्या: वैशाली मुळे
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळाव्या: वैशाली मुळे
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळाव्यात आणि अनावश्यक वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांनी तरुणांना केले.
गणेश मंडळ अध्यक्ष, पोलिस पाटील आणि शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. ही बैठक २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक गणेश मंडळाने आपले नोंदणी प्रमाणपत्र व्यवस्थित ठेवावे, सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारू नयेत. फेसबुक, व्हॉट्सॲपसह, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिसांचे लक्ष असते. त्यामुळे कुणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये. गणेश मंडळांच्या ठिकाणी जुगार किंवा इतर बेकायदेशीर कृत्ये होऊ नयेत, याची जबाबदारी आयोजकांवर आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती उत्सव साजरा करावा व डीजे संस्कृतीला फाटा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून एसडीपीओ वैशाली मुळे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ, ठाणेदार प्रवीण धुमाळ, नायब तहसीलदार अक्षय नागे, उपअभियंता उल्हास वाघ तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्य उपस्थित होते. संचालन उपनिरीक्षक नीलेश चाटे यांनी केले तर आभार
Comments
Post a Comment