आश्रमशाळेतील कर्मचारी पगारापासून वंचित.....
आश्रमशाळेतील कर्मचारी पगारापासून वंचित....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- अकोला जिल्हातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिण्याचे पगार अजून झालेले नाहीत. शासनाने माहे आगष्टचे पगार गणेश चतुर्थीपूर्वी करण्याचे आदेश काढलेले असतांना अकोला जिल्हातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जुलैचेच पगार झालेले नसल्यामुळे कर्मचारी दोन महिण्यापासून वंचित आहेत. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना एक महिना पगार नेहमीच उशिराने मिळतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची घर कर्ज,वाहन कर्ज तसेच बँकाचे विविध कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्या जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना बँकाचे जास्तीचे नाहक व्याज भरावा लागतो. सणासुदीचे दिवस असल्यामुळे असेच पगार उशिरा होत राहिले तर बँका कर्मचाऱ्यांच्या एकाच महिण्याचे पगारातून दोन दोन कर्जाचे हप्ते कपात करतात. परिणामी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा येत नाही. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना आर्थीक त्रास सहन करावा लागतो. शासनाकडे पगार अनुदान वेळेवर मिळणे करिता सतत पाठपुरावा करूनही काहीच परिणाम होत नाही. वर्षानुवर्षे आजतागयात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर झालेले नाहीत. किमान आतातरी सणासुदीचे दिवस असल्याने जुलै आणि आँगष्ट महिण्याचे पगार एकत्रितपणे करण्यात यावे करिता आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
Comments
Post a Comment