डॉ तारेश आगसे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार....
डॉ तारेश आगसे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- स्थानिक बार्शिटाकळी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जमुना द्वारा संचलित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फिजिकल डायरेक्टर डॉ तारेश आगाशे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी मंचकावर डॉ मधुकरराव पवार डॉ तारेशे आगाशे सौ आरती आगाशे प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान उप प्राचार्य डॉ संतोष हुशे , डॉ अमित वैराळे प्रा सुधीर राऊत नंदकुमार राऊत डॉ नीलिमा कंकाडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली
सर्वच विभागाच्या वतीने विभाग प्रमुखांच्या हस्ते डॉ तारेश आगाशे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले तर संस्था व महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान यांनी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव केला तर संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ मधुकरराव पवार यांनी सह पत्नी साडी चोळी ड्रेस देऊन मानचिन्ह देऊन सत्कार केला समाजशास्त्र विभागाच्या वतीने डॉ दीपक चौरपगार यांनीही बुके देऊन त्यांचा सत्कार केला
यावेळी डॉ तारेश आगाशे यांनी सत्काराला उत्तर देत असता संपूर्ण आपल्या सेवा कालावधीचा पाढाच मांडला यावेळी ते भाऊक होऊन त्यांनी आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली महाविद्यालयाच्या सेवेसाठी आपण केलेले कार्य तसेच प्राचार्य पदी असताना घेतलेली भूमिका याबद्दल विस्तृत माहिती विशद केली
प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान यांनी तर डॉ तारेश आगाशे हे आपले गुरु होते त्यांनी घडवलेले विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत आहे त्यातलं एक जिवंत उदाहरण म्हणजे या महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान असे विविध उदाहरणे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणामधून डॉ मधुकरराव पवार यांनी महाविद्यालयाच्या आपले पासून तर या महाविद्यालयाचे ते आज मोठे रूप धारण केल आहे त्यामध्ये खूप मोठा वाटा असल्याचे नमूद केले महाविद्यालयाला न्याय नामांकन मध्ये जो अ दर्जा प्राप्त झाला त्यामध्ये सुद्धा त्यांचे मोठे योगदान असल्याचेही स्पष्ट केलेया वेळी त्यांनी मुद्दामच *संस्थापक प्राध्यापक* हा शब्द वापरला तेव्हा अनेकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले डॉ मोहन बल्लाळ यांनी मानपत्राचे वाचन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ अमित वैराळे यांनी केले शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी प्रवास बॅग भेट देऊन सत्कार केला तर डॉ आगाशे यांनी महाविद्यालयातील सकाळ गृह हॉलसाठी भेटवस्तू दिली. सेवानिवृत्त कर्मचारी वरिष्ठ लिपीक रवींद्र भटकर व लायब्ररी अटेंडंट मुफीज खान यांनी सुद्धा भेट वस्तू शाल व बुके देऊन माजी प्राचार्य डॉ तारेश आगाशे यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सिद्धार्थ वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रवीणकुमार राठोड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष जाधव, पंजाब जाधव, मंगेश चव्हाण, रवी शेगोकार ,सुरेश राठोड व डी एम पवार यांनी अथक परिश्रम घेतले
Comments
Post a Comment