बार्शिटाकळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील नालीचे स्थान बदलावे – बौद्ध बांधवांची मागणी...
बार्शिटाकळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील नालीचे स्थान बदलावे – बौद्ध बांधवांची मागणी...
बार्शिटाकळी :- पंचायत समिती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील वॉल कंपाऊंडला लागून नालीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामाला स्थानिक बौद्ध बांधवांचा तीव्र विरोध असून, नालीचे नियोजित स्थान त्वरित बदलावे तसेच पुतळ्यासमोरील जागा पार्किंगसाठी आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी त्यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरवर्षी भीम जयंती आणि धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पुतळ्यासमोरील परिसरात हजारो अनुयायी, नागरिक आणि मान्यवरांची उपस्थिती असते. या वेळी परिसर पूर्णपणे गर्दीने भरलेला असल्यामुळे पार्किंगसाठी मोकळी जागा असणे अत्यावश्यक आहे. जर सदर नालीचे काम सुरू ठेवले गेले, तर सार्वजनिक सोयीस अडथळा निर्माण होईल तसेच नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जातील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीबाबत संबंधित यंत्रणांनी त्वरित पाहणी करून निर्णय घ्यावा, अशी एकमुखी भूमिका समस्त बौद्ध बांधवांनी घेतली अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल
असा इशारा बार्शिटाकळी शहरातील समस्त बौद्ध बांधवांनी दिला यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, शुभम इंगळे , शुध्दोधन खंडारे, संतोष गवई , वकील जामनिक ,अरविंद जामनिक , वैभव धुरंधर, पिंटू खंडारे , संतोष डोंगरे , बाळू खंडारे , सनी धुरंधर, रक्षक जाधव , शीलवंत ढोले आदी समाज बांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment