बार्शिटाकळी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न......
बार्शिटाकळी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडेबार्शिटाकळी – बार्शिटाकळी शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर युथ मोमेंट ऑफ महाराष्ट्र आणि एसआयओ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, प्रख्यात डॉक्टर आणि तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदानाचे महत्त्व सांगून आयोजकांनी नागरिकांना या उदात्त कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.शिबिरात एकूण ९१ युनिट रक्तदान करण्यात आले. यासोबतच साई ब्लड बँकेनेही या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होईल.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजन समितीने सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले आणि भविष्यातही सामाजिक कार्य सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा केली.या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी युथ मोमेंटचे अध्यक्ष सय्यद असीम उमर खान, आतिफ सर, मुदसिर, नदीम, अझीम, एसआयओचे राजा साजिद, अम्मार, सफवान, नूर, इत्यादींनी खूप परिश्रम घेतले
Comments
Post a Comment