मेस्को कंपनी च्या सहायक व्यवस्थापनाकडून महिलेसोबत अश्लिल वर्तन... 👉मेस्को कंपनीच्या सहायक व्यवस्थापक जयप्रकाश नामदेव इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल.....
मेस्को कंपनी च्या सहायक व्यवस्थापनाकडून महिलेसोबत अश्लिल वर्तन...
👉मेस्को कंपनीच्या सहायक व्यवस्थापक जयप्रकाश नामदेव इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : - जिल्हा स्त्री रुग्णालय येथे काही दिवसांपूर्वी मेस्को कंपनी च्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या सहकारी महिला सुरक्षा रक्षकांच्या विनयभंगाचची घटना ताजी असतानाच आता मेस्को कंपनी च्या सहायक व्यवस्थापकपदावर कार्यरत जयप्रकाश नामदेव इंगळे याने एका महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील संभाषण करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी मेस्को कंपनीतील सहायक व्यवस्थापकाविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मेस्को कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. तिचे पतीदेखील याच कंपनीत कार्यरत होते, मात्र त्यांची नोकरी काही काळापूर्वी संपवण्यात आली.
मेस्को कंपनी चा सहायक व्यवस्थापक जयप्रकाश नामदेव इंगळे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी असून मेस्को कंपनी मध्ये नौकरी देण्यासाठी लोकांना पैश्याची मागणी करतो
खदान पोलिस स्टेशन हद्दीतील घटना असून, जयप्रकाश नामदेव इंगळे मेस्को कंपनीत सहायक व्यवस्थापकपदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी २०२५ पासून ते २६ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या कालावधीत आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधून अश्लील आणि लज्जास्पद भाषा वापरली, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी फिर्यादीने २९ ऑगस्ट रोजी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध संबंधित विविध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलिस करीत आहेत.
Comments
Post a Comment