कान्हेरी सरप येथे एसडीओ अपार यांनी साधला जनसंवाद....
कान्हेरी सरप येथे एसडीओ अपार यांनी साधला जनसंवाद
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : कान्हेरी सरप येथे महसूल खात्याकडून आयोजित करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या जनसंवाद कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्राचे महसूल मंत्रीयांनी जनसंवाद या कार्यक्रमाचे माध्यमातून महसूल अधिका-यांनी गावांमध्ये जाऊन जनतेच्या तक्रारी सोडविणेबाबत निर्देश दिलेले आहेत. या अंतर्गत संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर यांनी बुधवारी कान्हेरी सरप येथे जनसंवाद साधला. तालुका व ग्राम पातळीवरील विविध शासकीय यंत्रणांचे अधिका यांचे उपस्थितीत गावक-यांच्या तक्रारी स्वीकारण्यात आल्यात. आलेल्या प्रत्येक तक्रारीवर तक्रारदाराचे समाधान करून ती संबंधित अधिका-यांकडे अंतिमतः निकाली काढण्यासाठी अग्रेषित करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला सरपंच सुनील ठाकरे, तालुका कृषि अधिकारी संध्या करवा, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उल्हास वाघ, सहायक गटविकास अधिकारी दिलीप सिरसाट, नायब तहसिलदार अक्षय नागे, विस्तार अधिकारी दीपक इंगळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. संचालन ग्राम महसूल अधिकारी विशाल काटोले यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी प्रमोद ठोसर, ग्रामपंचायत अधिकारी शिवदास गवई, ग्राम महसूल अधिकारी माधुरी खरात, अनिल खंडारे, प्रविण ताले, महसूल सेवक विपूल जाधव, महेंद्र भुयार, जयश्री नारनवरे यांचेसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment