शेतकऱ्यांना कुळात मिळालेल्या जमिनींच्या सातबारावरील शर्तीचा शेरा कमी करण्याची कार्यवाही....
शेतकऱ्यांना कुळात मिळालेल्या जमिनींच्या सातबारावरील शर्तीचा शेरा कमी करण्याची कार्यवाही
बार्शिटाकळी :- महसूल सप्ताह निमित्त आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी बार्शिटाकळी तहसील अंतर्गत कुळ कायदा कलम ४३, ५०-३ आणि ५७ चे झालेल्या सुधारणेच्या अनुषंगाने कुळाने जमीन खरेदी करून १० वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचे मंडळ अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले. यामध्ये अशा शेतकऱ्यांकडून जमीन महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा रकम तलाठी यांनी भरून घेण्याची कार्यवाही करावी व तदनंतर तलाठी यांनी अशा सात बारा उताऱ्यावरील शर्तीचा शेरा कमी करण्याबाबत सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना सदर सूचित करण्यात आले. अभियानामध्ये आज तहसील कार्यालय बार्शिटाकळी येथे प्रतिनिधिक स्वरूपात तहसीलदार राजेश वझीरे यांचे हस्ते मौजे जलालाबाद येथील शेतकरी मिलिंद अंबादास तायडे यांना त्यांचे कुळात मिळालेल्या जमिनीचे आकारणीच्या चाळीस पट नजराणा रकम भरून घेऊन त्यांचे सातबारा वरील शर्तीचा शेरा कमी करून फेरफार व सातबारा देण्यात आला. सदर कार्यवाही तलाठी जलालाबाद सुदेश च रहाटे, मंडल अधिकारी राजंदा संतोष कर्नेवार व सहायक डीबीए विशाल काटोले यांनी पार पाडली. तरी कुळात जमीन मिळून १० वर्ष पूर्ण या झालेल्या शेतक त्यांनी अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार राजेश वझीरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment