खोलेश्वर सेवा समितीची वाघागड ते बार्शिटाकळी कावड यात्रा...

खोलेश्वर सेवा समितीची वाघागड ते बार्शिटाकळी कावडयात्रा
बार्शिटाकळी, दि. ४ (प्रतिनिधी श्रावण भातखडे ) :-श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी वाघागड ते बार्शिटाकळी पायदळ कावडयात्रा संपन्न. हिंदू धमार्तील सर्वांत पवित्र अशा पावन महिन्यात ठीक ठिकाणी कावडयात्रा संपन्न होत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून बार्शिटाकळी येथील पुरातन श्री खोलेश्वर मंदिरात होणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमात आपली सेवा देणाऱ्या व नित्य नियमाने मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या पुरातन शिवलिंगावर फुलांच्या आकर्षक सजावटीसह आरती करण्याचे अखंड कार्य करत असलेल्या श्री खोलेश्वर सेवा समिती यांनी यावर्षी पासून श्री वाघागड ते बार्शिटाकळी पायदळ कावडयात्रा
आयोजित करून श्री क्षेत्र गुप्तेश्वर येथे असलेल्या जलाशयातून, पारंपारिक पद्धतीच्या कावडीने पाणी आणून खोलेश्वर मंदिरात असलेल्या पुरातन शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शहरातील नियोजित शिवछत्रपती पुतळ्याच्या जागेपासून ते खोलेश्वर मंदिरा पर्यंत पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी शहरातील शिवभक्तांचा उत्सुर्फ असा प्रतिसाद मिळाला. शिव छत्रपती व्यायाम शाळा अध्यक्ष संकेत सपकाळ, शंभुसेनेचे सचिन आगाशे, दिपक कळसाईत, महाकाल ग्रुपचे चेतन करपे यांची प्रमुख उपस्थिती. सदर उत्सवात संकेत सपकाळ यांचे कडून फराळ तर गणेश वन्हाडे यांच्या कडून चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही पायदळ कावडयात्रा यशस्वी करण्यासाठी श्री खोलेश्वर सेवा समितीचे संघटक चंद्रशेखर ग्याने, उपसंघटक नरेश अग्रवाल, अध्यक्ष संतोष झरकर, उपाध्यक्ष संजय कारावडीया, कोषाध्यक्ष निखिल दांदळे, सचिव वीरू ठाकूर यांच्यासह सेवा समितीचे सभासद आदित्य ठाकूर, पवन अग्रवाल, रितेश आकोत, हर्ष दुबे, राम करपे, रवी राऊत (फुलवाले), गोविंदा वऱ्हाडे , निलेश वायकर, अरविंद राऊत, मयुरेश अग्रवाल, शुभम करपे, अजिंक्य झरकर, अर्जुन काळदाते, सागर करपे, सोपान वाघमारे, प्रतीक घाईत, मयूर भवाने, आकाश भोसले, दीपक वैराळे, आकाश वऱ्हाडे, रोहित तायडे, गोपाल कापकर, गजानन आरेकर, सौरभ ठाकूर, राहुल दासर व प्रणव खोपे यांनी अथक परिश्रम घेतले. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे