महाराष्ट्र कुरैशी समाजाचा पारंपरिक व्यवसाय वाचवण्यासाठी आवाज, राज्य सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम....
महाराष्ट्र कुरैशी समाजाचा पारंपरिक व्यवसाय वाचवण्यासाठी आवाज, राज्य सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी (मुफीज खान) महाराष्ट्र राज्य कुरैशी समाज संघर्ष समिती शाखा बार्शिटाकळीने दिनांक ४ ऑगस्ट रोजी भोलू चौधरी आणि अलाऊद्दीन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बार्शिटाकळी आणि नगर पंचायत मुख्याधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, कृषी मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत पारंपरिक व्यवसायावर होणाऱ्या अन्याय, बेछूट कारवाई आणि सामाजिक बहिष्काराविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. कुरैशी समाजाचा आरोप आहे की महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने जनावरांचा व्यापार, वाहतूक व वध व्यवसाय कायदेशीररित्या केला जातो, मात्र अलीकडच्या काळात या व्यवसायावर बंदी घालण्याचे प्रकार वाढले असून समाजावर आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दडपण आणले जात आहे. समाजाच्या म्हणण्यानुसार पोलिस आणि प्रशासनाकडून कोणतेही ठोस पुरावे नसताना खोट्या प्रकरणात व्यापाऱ्यांना अडकवले जात आहे, वाहने जप्त केली जात आहेत, तसेच जनावरांची तस्करी किंवा बेकायदेशीर व्यापाराच्या नावाखाली त्रास दिला जात आहे. समाजाने मागणी केली आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक व्यवहार पारदर्शक व्हावेत, यासाठी डिजिटल पेमेंट पोर्टल, ऑनलाइन बाजार बुकिंग आणि लिपिकीय नोंदणीची व्यवस्था करण्यात यावी. व्यापाऱ्यांना संपूर्ण राज्यभर समान आणि स्वस्त दरात व्यापार परवाने मिळावेत आणि त्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरु करावी. वाहन परवान्याची प्रक्रिया देखील पूर्णपणे ऑनलाइन करून RTO व इतर अधिकाऱ्यांकडून NOC घेणे सोपे व्हावे. तसेच Pre आणि Post Slaughter प्रमाणपत्र, वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्राण्यांच्या क्रौर्य प्रतिबंधक अधिनियमाच्या नियम ९६ नुसार आवश्यक कागदपत्रे मिळणे बंधनकारक करावे. व्यवसायाशी संबंधित सर्व परवानग्यांसाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरु करावी जेणेकरून एकाच ठिकाणी NOC, प्रशिक्षण, नोंदणी, वाहतूक, लायसन्स आदी प्रक्रिया पूर्ण करता येतील. स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत बुत्चरी, फूड सेफ्टी आणि पशु व्यापार प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत. प्रत्येक तालुक्यात सरकारी स्लॉटर हाउसची स्थापना करावी जेणेकरून बेकायदेशीर कत्तल थांबेल आणि कायदेशीर व्यवसाय सुरळीत होईल. कोढबोबा (जनावरांसाठी निवारा) ची सुविधा त्वरित सुरु करावी, न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेली गोरक्षक केंद्रे बंद करण्यात यावीत आणि गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. समाजाने मागणी केली आहे की BNS कलम १५३, १५३A, २९५A, ५०५ अंतर्गत समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि स्पष्ट नियमावली जारी करण्यात यावी ज्यायोगे कुरैशी समाज व संबंधित व्यापाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल आणि ते भीतीमुक्तपणे व्यवसाय करू शकतील. निवेदनात हे देखील नमूद करण्यात आले आहे की जर १० दिवसांच्या आत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर कुरैशी समाज महाराष्ट्रभर संविधानिक आंदोलन छेडेल आणि याची सर्व जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल. समाजाने स्पष्ट केले आहे की ते संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष करतील आणि शांततापूर्ण पण प्रभावी जनआंदोलनाचे रूप घेतील. निवेदनावर मो. शकील चौधरी, मो. ख्वाजा चौधरी, मो. जी. चौधरी, सकी चौधरी, शेख फिरोज चौधरी, शेख खलील, रफिक डॉन, शेख इम्रान शेख अजीज, शेख वसीम, शेख लुकमान, शेख साजिद, शेख रईस, शेख शरीफ, समीर चौधरी, सोनू चौधरी, शेख हफीज, शेख मुजम्मील, शेख सलीम, शेख जाकीर, मो. सादिक, शेख मोबिन, शेख शाहिद, शेख इम्रान शेख हमीद, शेख अय्याज, शेख रहमान, शेख फैजान तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक हाजी महेफूज खान, वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते नईमोद्दीन शेख, माजी सरपंच मासूम खान, सय्यद जहांगीर, डॉ. तनवीर जमाल, वरिष्ठ पत्रकार मुफिज खान, पत्रकार शेख इमाम, गुफरान शेख, हाजी रफिक सेठ, हाजी सय्यद रागीब, जमीयत तालुका सचिव हाजी सय्यद आशिक, सय्यद गालिब, इम्रान खान (फळ व्यापारी), मो. रिजवान आदी उपस्थित होते.
"हे प्रकरण केवळ एका समाजाचे नसून रोजगार, धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानिक हक्कांशी निगडित एक गंभीर प्रश्न बनला आहे. आता हे पाहावे लागेल की सरकार योग्य वेळी पावले उचलते की कुरैशी समाजाला रस्त्यावर उतरावे लागते.''
जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांच्याकडून इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल भाऊ भटकर यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेरी सरप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुस्तमाबाद वा शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बंगचे मोफत वाटप करण्यात आते.
गोपाल भाऊ भटकर यांनी हा उपक्रम स्वखर्चातून राबविला. या उपक्रमाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढावा आणि जिल्हा परिषद शाळेचे अस्तित्व टिकून राहावे व मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व वृद्धिंगत व्हावे आणि सामाजिक जाणीव याचे भान राहावे या अनेक शुद्ध हेतूंनी गोपाल भाऊ भटकर यांनी हा उपक्रम अतिशय उत्साहाने परिसरामध्ये राबविला.
सर्वप्रथम कान्हेरी सरप येथील जिल्हा परिषद शाळेत स्कूल बैग वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर लगेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा येथे आणि नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुस्तमाबाद येथे स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी कान्हेरी सरप वेधील सरपंच सुनील ठाकरे, उपसरपंच ज्ञानेश्वर सरप ग्रामपंचायत सदस्य, शाळा स्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, तुळशीराम लोथे, अतुल निकोले, मंगेश तायडे व पालक
उपस्थित होते. त्याचप्रमाणे आळंदा येथे उपसरपंच विश्वनाथ जानोरकर, पोलीस पाटील सुनील खाडे, बंडू पाटील, एसएमसी अध्यक्ष चैताली बेद्रे, उपाध्यक्ष शिल्पा मोहोड त्याच्चप्रमाणे स्स्तमाबाद येथे सरपंच गजानन भाऊ म्हैसने, अमोल म्हैसने, रामाभाऊ काळे, श्रीकृष्ण राऊत, एसएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष व पालक उपस्थित होते. अशा सामाजिक जाणिवेतून उपक्रम राबविल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण भविष्यात निश्चितच वादेत असा विश्वास गोपाल भाऊ भटकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांनी सर्व मान्यवरांचे या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
मुन्शी प्रेमचंद, गोस्वामी तुलसीदास आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- स्थानिक गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे मुन्शी प्रेमचंद, गोस्वामी तुलसीदास आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख सुधीर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. पी. एन. राठोड, डॉ. मोहन बल्लाळ यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला समन्वयक आणि प्राध्यापक आणि हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण देशमुख, समन्वयक वैशाली सोनोने आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात, अध्यक्षीय भाषणादरम्यान, सुधीर राऊत यांनी अशा कार्यक्रमांची आवश्यकता स्पष्ट केली आणि मुन्शी प्रेमचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, डॉ. प्रवीण देशमुख यांनी हिंदीबद्दलच्या त्यांच्या समर्पणाबद्दल स्पष्टीकरण देताना प्रेमचंद यांच्या योगदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस सारखे महाकाव्य कसे रचले यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे, इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. बी. मोहन बल्लाळ यांनी आपल्या भाषणात प्रेमचंद यांच्या उर्दूतील योगदानाव्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे आणि तुलसीदास यांच्या उल्लेखनीय कार्यांवर प्रकाश टाकला आणि साहित्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. कार्यक्रमाची रूपरेषा, सूत्रसंचालन वैशाली यांनी केले आणि प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण देशमुख यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने वरिष्ठ आणि कनिष्ठ प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. के.आर. नागुलकर, डॉ. पी.एन. राठोड, डॉ. दीपक चौरपगार, डॉ. राजू सरकटे, डॉ. सुनील कोल्हे, डॉ. अनिलकुमार दडमल, डॉ. वैशाली कोटंबा, प्रा. ए.बी. पाटील, डॉ. आयडोले, डॉ. सिद्धार्थ वाघमारे, डॉ. संतोष सुरडकर आणि इतर सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेत योगदान दिले.
Comments
Post a Comment