मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रध्वजाला सलामी नाही👉बार्शिटाकळी नगर पंचायतमधील प्रकार : शासन आदेशाची पायमल्ली
मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रध्वजाला सलामी नाही
👉बार्शिटाकळी नगर पंचायतमधील प्रकार : शासन आदेशाची पायमल्ली
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- शहरासह, तालुक्यात मोठ्या प्रमाणात भारतीय स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापनदिवस मोठ्या उत्साहात साजरा. परंतु नगर पंचायत बार्शिटाकळी नगर पंचायतीच्या कार्यक्रमाला मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने राष्ट्रध्वजाला सलामीच दिली गेली नाही. सोबतच राज्यगीताचा देखील विसर पडला.
येथे राज्यगीत येथे गायल्या गेले नाही. शासन आदेशाची पायमल्ली करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की भारतीय स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापनदिवस आज दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी देशभर साजरा होत असताना, तो बार्शिटाकळी शहर व तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात साजरा झाला. परंतु दुर्दैवाने म्हणा की नियोजनाचा अभाव, शासनाचे स्पष्ट निर्देश असताना, राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत म्हणणे
बंधनकारक असताना सुद्धा ते सादर करण्यात आले नाही. धिसाळ नियोजन व राज्यगीता बद्दलची अनास्था यामुळे हे घडून आले असेही म्हटले तर ते वावगे ठरू नये, नगर पंचायत कार्यालयात राष्ट्रगीता नंतर राज्यगीत सादर केले तर नाहीच नाही.
आणि ह्यावर कळस म्हणजे ध्वजारोहण झाल्यावर सलामी सुध्दा दिली नाही. मुख्याधिकारी अनुपस्थित असल्यामुळे ध्वजारोहणाचा कार्यक्रम कार्यालय अधीक्षक विनोद बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. परंतु त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कार्यक्रमाची पुरत्ती वाट लागली. उपस्थित मंडळीनी त्यांना, त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर मोबाईल काढून, युट्यूबवर सुतकी चेहऱ्याने राज्यगीत लावण्याचा खटाटोप केला. त्यांचा हा सारवासारव करण्याचा प्रयत्न कुणालाही आवडलेला नाही.
'' पातूर नगर परिषद कोर्ट प्रकरणामुळे मी दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालय येथे गेलो. वेळेत पोहचू शकणार नसल्याने नियोजित कार्यक्रम वेळेत होणे करिता कार्यालय अधीक्षक विनोद बोरकर यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले.
- राहुल कंकाळ, मुख्याधिकारी नगर पंचायत बार्शिटाकळी.
Comments
Post a Comment