बार्शिटाकळी शिबिरात एमआयएमचा सामाजिक उपक्रम यशस्वी, ५० युनिट रक्तदान..

बार्शिटाकळी शिबिरात एमआयएमचा सामाजिक उपक्रम यशस्वी, ५० युनिट रक्तदान
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील खडकपुरा चौकात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. एमआयएमचे कार्यकर्ते आणि माजी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील युवक आणि नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदान करून तरुणांनी समाजसेवेची प्रशंसनीय भावना दाखवली. या शिबिरात एकूण ५० युनिट रक्त गोळा करण्यात आले. आयोजक पक्षाच्या वतीने रक्तदान हे सर्वात मोठे दान आहे, जे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकते, असे सांगण्यात आले. म्हणून, प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. एमआयएम बार्शिटाकळीने शिबिर यशस्वी करण्यात मदत केली.
शहरातील आजी , माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे उपस्थित होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि भविष्यातही असे कल्याणकारी उपक्रम आयोजित केले जातील असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे