पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ 'व्हॉईस ऑफ मीडिया' बार्शिटाकळीतर्फे ठाणेदारांना निवेदन...

पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ 'व्हॉईस ऑफ मीडिया' बार्शिटाकळीतर्फे ठाणेदारांना निवेदन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी  : एका हिंदी दैनिकाचे संपादक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मिडिया बार्शिटाकळी तालुकाच्या वतीने बार्शिटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण धुमाळ यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
संबंधित आरोपींविरुद्ध पोलिस विभागाने दिलेली प्रेसनोट ही प्रसिद्ध करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी हा हल्ला केला. या घटनेला लोकशाही आणि पत्रकारितेवर झालेला थेट हल्ला
ठरवत आरोपींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी व्यवस्था उभारण्यात यावी, अशीही मागणी संघटनेने केली. या प्रसंगी 'व्हॉईस ऑफ मिडिया'चे जिल्हा सचिव डॉ श्याम ठक, ज्येष्ठ मार्गदर्शक मुफीज खान, तालुकाध्यक्ष संजय वाट, सचिव तारीक शेख, उपाध्यक्ष भावेश पटेल, तालुका उपसंघटक श्याम कुलकर्णी, शहराध्यक्ष गुफरान शेख, सहसचिव बाळकृष्ण उताने पाटील, कोषाध्यक्ष कुमार काकड, भारत चव्हाण, तसेच शेख इमाम, नदीम खान, रामदत्ता राठोड, मो. रफिक, नसुरुल्लाह खान, संजय चव्हाण आदी पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे