बार्शिटाकळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान..राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे तहसीलदारांना निवेदन....


बार्शिटाकळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान..
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे तहसीलदारांना निवेदन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी, :- बार्शिटाकळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके पावसामुळे पाण्यात बुडून नष्ट झाली आहेत.

अनेक शेतकऱ्यांचे हातचे पीक पाण्याच्या प्रकोपामुळे वाया गेले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वाखाली बार्शिटाकळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान. सरफराज खान तालुकाध्यक्ष सतीश पाटील गावंडे शहराध्यक्ष अय्याज खान खान 'गोपाळराव कटाळे अदिनच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, शासनाच्या यंत्रणेमार्फत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.
तसेच बार्शिटाकळी तालुका व परिसर 'ओला दुष्काळग्रस्त' घोषित करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. शेती हीच उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उदरनिर्वाहाच्या संकटात आले असून, शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मदत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तहसीलदारांनी निवेदन स्विकारून शासनाकडे तातडीने पाठवण्याचे आश्वासन दिले. या वेळी अविनाश डोंगरदिवे सलिमोददिन शेख मो समीर गोहर आली खान अदिनची उपस्थिति होती.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....