ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी येथे युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त फळ वाटप.....
ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी येथे युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त फळ वाटप...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- आज युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी येथे फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ताजी फळे वाटून सेवा आणि सौहार्दाचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दीक (युवा काँग्रेस जिल्हा प्रवक्ते, अकोला जिल्हा ग्रामीण), सोहेल खान सलीम खान (शहर अध्यक्ष, काँग्रेस बार्शिटाकळी), अन्वरुलहक (कोषाध्यक्ष), सईद खान (उपाध्यक्ष), सय्यद वाजिद, ईश्वर ढेंगळे, शुभम राजूरकर, नितेश वाघमारे, इर्शाद खान, मोहम्मद आदिल तनवीर खान आणि युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले की, स्थापना दिनानिमित्त हे सेवाकार्य करण्याचा उद्देश समाजात सहकार्य आणि मानवतेचा संदेश पसरवणे आहे. उपस्थित सर्व सदस्यांनी गरजूंना मदत करत राहण्याची प्रतिज्ञा घेतली.
Comments
Post a Comment