अवैध उत्खननाचा पर्दाफाश : ट्रक चालकांचा GPS व CDR तपासून चौकशीची मागणी....
अवैध उत्खननाचा पर्दाफाश : ट्रक चालकांचा GPS व CDR तपासून चौकशीची मागणी
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- विझोरा शिवारात ४ जून रोजी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरुम उत्खनन व वाहतूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल जाननिक व विशाल गवई यांनी जिल्हाधिकारी, अकोला यांच्याकडे सखोल चौकशीची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित शेती मधेऊन वीणा परवाना ट्रक भरून मुरुमाची वाहतूक सुरू होती. काही ट्रक आधीच भरून रस्त्यावर उभे होते तर काही ट्रक मुरुम भरून निघाले होते. ट्रक चालक व सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधून चौकशी करताना त्यांनी सांगितले की ही वाहतूक श्री स्वामी "इंजिनिअर्स लि. पुणे" या कंपनीमार्फत सुरू आहे. संबंधित ट्रकवर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने हे प्रकरण अत्यंत संशयास्पद वाटत आहे.
तक्रारदारांनी या संदर्भात तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांना वारंवार माहिती दिली, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे, ट्रक थांबवून विचारणा करताना ट्रक चालक व सुपरवायझरने खुलासा देण्याचे टाळले व काही वेळातच ते ट्रक घेऊन पसार झाले.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी., GPS लोकेशन व CDR तपासून ट्रक कुठून आले, कुठे गेले, याचा मागोवा घ्यावा.,संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी., ट्रक मालक व सुपरवायझर यांचा जबाब नोंदवून त्यांची पार्श्वभूमी तपासावी.
हा प्रकार शासनाच्या महसूल यंत्रणेतील अपयश दर्शवणारा असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहील, असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.
पिंजर बायपासवरील प्रवासी निवारा बनला जीवघेणा, संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बाशिटाकळी :- तालुक्यातील पिंजर येधील बायपास बस स्थानक प्रवासी निवारा स्थानिक प्रवासी निवान्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे,
यामुळे पिंजर येवील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून एक खांब कोसळलेला आहे, तो कधी कोसळेल, यांची शार्बती नाही, यामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. हा प्रकार टाळण्याकरिता या समेस्येची घेऊन येथे नवीन प्रवासी निवारा बांधावा, अशी पिंजर येथील नागरिकांनी मागणी केली आहे, पिंजर परिसरातील नागरिकांकरिता दखत महत्वाची आहे, अकोला कारंजा या राज्य मार्गावर पिंजर गाव येते या गावावरून अकोला, करंजा, अमरावती, तसेच समृद्धी महामार्ग जाण्याकरिता मार्ग आहे, जवळ पास पिंजर गावाला ६४ खेडेगाव जुळले आहे, गावातील प्रवासी निवाऱ्यावरून परिसरातील गावाकडे जाण्याकरिता बस मिळते यामुळे ६४ खेड्यावरील प्रवासी येथून ये-जा करतात येथील प्रवासी निवाऱ्यावर कायम वर्दळ असते.
दररोज येथू १०० ते २०० हून विद्यार्थी या प्रवासी निवारात येतात परिवहन मंडळाला पिंजर येवून चांगलेच आर्थिक उत्पत्र प्राप्त होते, परंतु येथे सुविधा देण्याकडे परिवहन मंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रयत्य येथील नागरिकांना केला आहे. पिंजर बायपास वरुण बार्शीटाकळी, अकोला, महान, कारंजा, मुर्तीजापुर, अमरावती, येथे जाण्याकरिता बस गाड्या पिंजर बायपास वरिल प्रवासी निवाराच्या खांब कोसळल्यामुळे प्रवासी निवारा केव्हाही कोसळू शकेल अशा स्थितीत आहे, तरीही त्याची साधी डागडुजी केली जात नाही, यासह येथे प्रवाशांना बसण्याची योग्य व्यवस्था नाही, येथे दिवसाला अनेक प्रवासी येतात, प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था प्रवासाच्या जीवावर बेतनारी ठरू शकते, विशेषत विद्यार्थी वयोवृद्ध या प्रवासी निवाऱ्यात थांबत असताना मोठी दुर्घटना होण्यापूर्वी येथील प्रवासी निवारा त्वरित बांधण्यात यावा अशी ग्रामस्थ व प्रवाशाची मागणी आहे, संबंधित विभागाने लक्ष देत कारवाई करून प्रवासी, विद्यार्थी यांना दिलासा देण्याची मागणी आहे.
Comments
Post a Comment