बार्शिकळीच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव .....
बार्शिकळीच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव ...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- शहरातील शेवटच्या टोकावर असलेल्या, सोनगीरी रस्त्यावरील वार्ड क्रमांक १७ जो इंदिरा आवास नावाने ओळखला जातो. या दुर्लक्षित परिसरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. त्याचे निराकरण व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेविका पती सैय्यद अबरार यांनी मुख्याधिकारी बार्शिटाकळी यांना दि.१२ सप्टेंबर रोजी एक निवेदन दिले आहे. ते लिहतात की आमच्या वार्डात 2 महिन्या पासून स्ट्रीट लाईट आणि 1 वर्षा पासून हायमस्ट लाईट बंद आहे. मी वारंवार संबंधित अधिकारी तायडे साहेब यांना सांगितले परंतु त्यांनी माझ्या विनंतीला न जुमानता एकाही समस्येचे निराकरण केले नाही. सैय्यद अबरार हे गेल्या 2 वर्षा पासून स्वतःच्या पैशाने लाईट लावलेले आहे वार्डातील लोकांना स्वताचे बोअरवेल वरून ४ वषार्पासून 12 ते 14 ठिकाणी नळ बसवून पाणी पुरवठा करत आहे. जे काम नगर पंचायतच्या संबंधित विभागाचे आहे ते वारंवार सांगूनही करत नसल्यामुळे समाजसेवकाला स्वतः पदरमोड करून करावे लागते. मग प्रश्न उभा राहतो की शहराच्या विकासासाठी येणारा निधी नेमका कुठे खर्च केल्या जातो ? मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांनी याचे उत्तर द्यावे न द्यावे परंतु सध्या ज्या समस्या उद्भवल्या आहेत त्या दूर करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.
" अनुदान अंतर्गत गब्बर किराणा ते आनंद यांचे घरा पर्यंत पेवार ब्लॉक रस्ता निर्मितीचे काम अर्शद खान नामक ठेकेदार यांनी घेतले होते वर्कऑर्डर जवळपास 3 वर्षा पूर्वी देण्यात आली तरी देखील अजूनही काम काही झालं नाही. दुसरा सिमेंट रोड कमर ठेकेदारचे घरा पासून ते सराटेचे घरापर्यंत पूर्ण झाला पण रोड मध्ये दोन ठिकाणी काशिफ खान नामक ठेकेदार यांनी रपटे टाकले नाही. त्यामुळे त्या रस्त्यावरून वाहने नेता येत नाही. स्ट्रीट लाईट व हायमस्ट लावणेोव्हर ब्लॉक रोडचे काम चालू करणे नाही तर ठेकेदारला ब्लैक लिस्ट करा
सैय्यद अबरार सैय्यद मीर सामाजिक कार्यकर्ते, बार्शिटाकळी
Comments
Post a Comment