नायब तहसीलदार यांनी जारी केलेले जन्म प्रमाणपत्र रद्द न करण्याबाबत :- बार्शिटाकळी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन....
नायब तहसीलदार यांनी जारी केलेले जन्म प्रमाणपत्र रद्द न करण्याबाबत :- बार्शिटाकळी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- सध्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नायब तहसीलदारांनी जारी केलेले जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक प्रवेश, सरकारी नोकरी, शासकीय योजना व इतर कायदेशीर कामकाजासाठी है प्रमाणपत्र अत्यंत महत्वाचे असल्याने नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत आहे.
नायब तहसीलदारांनी नियम व कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करूनच ही प्रमाणपत्रे दिलेली आहेत. त्यामुळे ती रद्द करणे हा जनतेवर अन्याय असून, त्यातून गोंधळ, असंतोष व त्रास वाढत आहे.
संपूर्ण शहरातील नागरिक कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेस पार्टीच्या बार्शिटाकळी चे तहसीलदार श्री राजेश वझीरे यांना, सदर जन्म प्रमाणपत्र रद्द करु नये व जनतेच्या हिताचा विचार करून या अन्यायकारक निर्णयास यांबविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. आपण या विषयाकडे तात्काळ लक्ष देवून नागरिकांना दिलासा द्यावा अशा प्रकारे निवेदन देण्यात आले यावेळी शहर कार्याध्यक्ष शेख अजहर शेख जमीर, माजी नगराध्यक्ष हाजी महेफुज खान, मासुम खान, हसन शाह, भारत बोबडे, आलमगीर खान, सै जहागीर, मो. शोयब, डॉ तनविर जमाल, शुभम राजुरकर, सै. ईमदाद, सै.असद अली, सइद खान, सै. वाजीद, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल खान, आदी कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment