कापशीच्या आठवडी बाजारात पाण्याचा त्रास...
कापशीच्या बाजारात पाण्याचा त्रास....
कापशी : ग्रामपंचायत कापशीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाजार परिसरात पाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वसंता कळंब यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त करत सांगितले की, "मी अनेक वेळा कापशी रोडचे ग्रामपचारतचे पदाधिकारी यांना वारंवार विनंती केली. मात्र प्रत्येक वेळी फक्त आश्वासनच मिळाले. प्रत्यक्षात मात्र माझ्या दुकानासमोरून नालीद्वारे पाण्याची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही."
ग्रामपंचायतीने लिलावाच्या वेळी लाखो रुपये घेतले, मात्र त्या पैशातून बाजारात थोडे सुधारणा कामही करण्यात आले नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. "गरिबांचे हाल करून या पैशांचा नेमका उपयोग तरी कशासाठी केला जातो?" असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, "आम्ही बाजारात येऊन दोन पैसे कमवावेत अशी अपेक्षा असते, मात्र दररोज पाण्याच्या त्रासामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे."
नागरिकांनी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करून पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
कापशी रोड येथे बाजारासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत कडुन गेल्या दोन वर्षाआधी 23 लाख रुपयाचे बाजार ओठे बांधण्यात आले त्यानंतर व त्याआधी दरवर्षी चार ते पाच लाखात बाजार हर्राशी होत आहे आणि पैसे ग्रामपंचायत जमा करत आहे तरी सुद्धा बाजाराची अशी परिस्थिती पाहून यामध्ये किती भ्रष्टाचार होत आहे आणि यासंदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दाखल करण्यात येणार आहे
Comments
Post a Comment