मदरसा मिस्बाहुल उलूम येथे हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न...
मदरसा मिस्बाहुल उलूम येथे हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- स्थानिक अरबी मदरसा मिस्बाहुल उलूम येथील विद्यार्थ्यांचे खिदमते खल्क फाउंडेशनच्या वतीने मेडिकल चेक अप करून होमिओपॅथिक औषधे सोबतच आलोपथीक ट्रीटमेंट सुद्धा देण्यात आले.
सदर शिबिर मदरसा मिस्बाहुल उलूम चे मुख्याध्यापक मौलाना अब्दुल सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून याचा 85 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
सदर शिबीराला यशस्वी करण्यासाठी डॉ मोहम्मद फौजान मलिक, जनता ब्लड लॅब चे मोहम्मद असरार अहमद, हाफीज कारी बासित,साजिद खान, नूर खान, आतिफ खान पठाण,शेख जुनैद कुरैशी,सय्यद रेहान, सफवान खान, अब्दुल रहेमान,मोहम्मद शोएब,शेख जमीर कुरैशी आदींनी अथक परिश्रम घेतले.सदर कॅम्प मध्ये फ्री ब्लड चेक अप ची वैवस्था तसेच विद्यार्थ्यांना फळे सुद्धा भेट देण्यात आली होती.
Comments
Post a Comment