शिर्ला येथे स्वास्थ नारी सशक्त परिवार मोहिमे अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर;....
शिर्ला येथे स्वास्थ नारी सशक्त परिवार मोहिमे अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर;....
प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे अकोला जिल्हा परिषद यांच्यावतीने आयोजित पातुर तालुका आरोग्य विभागांतर्गत शिर्ला उपकेंद्र येथे स्वास्थ नारी सशक्त परिवार अभियान दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्याकरिता तालुका पातुर प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर अंतर्गत उपकेंद्र शिर्ला येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन गरोदर मातेच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले व अभियाना अंतर्गत आरोग्य सेवा माता व बाल सुरक्षा कार्ड प्रधानमंत्री मातृत्वंद योजना नोंदणी, आयुष्यमान वय वंदना कार्ड, सिकलसेल कार्ड, पोषण ट्रॅकर मध्य लाभार्थी नोंदणी महिलांचा सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान शिबिर निश्चय मित्र स्वयंसेवक नोंदणी,अवयव दान नोंदणी तसेच सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्यसेवा व आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह, नेत्र दंत रोग तपासणी स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी लसीकरण सेवा ,रक्त व हिमोग्लोबिन तपासणी क्षयरोग तपासणी सिकलसेल आजार व रक्तशय तपासणी विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच निरोगी जीवनशैली आणि पोषण उपक्रम राबवित स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार मासिक पाळी स्वच्छता व पोषण टेक होम राशन चे वितरण करणे असे बहुसंख्य विशेष बदल घडवण्यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशभर महिला आरोग्य स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे अकोला जिल्हा परिषद येथे राबविण्यात येत आहे मुख्य मार्गदर्शक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत पवार, माता बाल संगोपन अधिकारी डॉ विनोद करंजीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गजानन इंगळे,प्रभारी वैद्यकीय अधिकारी पातुर डॉ गणेश लोखंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व २२७ उपकेंद्र येथे संपूर्ण आरोग्य विभागात स्वस्थ नारी सशक्त परिवार अगदी उस्फूर्ती पणे व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अभियानांतर्गत स्वास्थ अभ्यंगता पातूर संगीताताई जाधव, सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ,विलास इंगोले, आरोग्य सेवक प्रदीप मोहोकार,आरोग्य सेविका संगीता पोरे, आरोग्य सेविका रेखा सपकाळ, योगा प्रशिक्षिका करुणा गवई उपस्थित होत्या,
Comments
Post a Comment