दगडपारव्यात विमुक्त जाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ......
दगडपारव्यात विमुक्त जाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ......
यावेळी राजेश वझीरे तहसिलदार बार्शिटाकळी, उपसरपंच ज्ञानेश्वर जामनिक हे होते. या शिबिरामध्ये विमुक्त व भटक्या जातीतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र ,जन्ममृत्यू नोंदणी प्रमाणपत्र व इतर आवश्यक अशा 159 प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सदर शिबिराचे प्रसंगी तहसिलदार राजेश वझीरे यांनी शासनाच्या विविध योजना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अंतोदय अन्न प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, ॲग्री स्टॅग, ई-पीक पाहणी, पांदन रस्ते व सेवा पंधरवाडा इत्यादी योजना विषयी माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी वसंत पारस्कर, संचालन प्रितेश गवई सेतु संचालक व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी नारायण दिवनाले यांनी केले. सदर शिबिरास ग्राम महसूल अधिकारी रचना धनाडे ,पुरवठा विभागाचे कैलास शेगोकार, आधार संचालक सुधीर डिडोळकर, सेतू संचालक प्रितेश गवई, सुरज चव्हाण, पवन जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र खंडारे, ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्य लाभार्थी नागरिक हजर होते
👉बंजारा समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील!....
👉ना. संजय राठोड यांचे प्रतिपादन.....
👉दगडपारव्याच्या संवाद मेळाव्याला प्रतिसाद....
बार्शिटाकळी :- बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देईल, बंजारा समाजाच्या हितासाठी मी प्रयत्नशील आहे. असे मत राज्याचे मृदू व अलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांनी केले
तालुक्यातील दगडपारवा घेधे बुधवारी आयोजित बंजारा समाज संवाद मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी प्रमोद उर्फ पप्पू चव्हाण तर प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मृदू खात्याचे मंत्री ना. संजय राठोड, पोहरादेवी संस्थानचे महत जितेंद्र महाराज, राजगडचे महंत रायसिंग महाराज, प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार, माजी उपसभापती सतीश पवार, दिलीप जाधव, हिरासिंग राठोड, गोपाल बव्हाण, जय किसन राठोड, गोरसिंग राठोड, सावित्रीबाई राठोड, संतोष राठोड, माजी सरपंच मनोहर राठोड आदी मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळयाला अभिवादन केले. यानंतर सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी विविध गावातील भजनी मंडळांना नंगारा वाद्याचे वितरण केले. दोन लहान मुलीनी मंत्री महोदयाचा सन्मान करून बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबतचे निवेदन कधन केले महंत रायसिंग महाराज यांच्यासह अनेकांनी विचार व्यक्त केले. यावेळी ना. संजय राठोड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे बंजारा समाजाची भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत बंजारा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून २३ मागण्यांपैकी १६ मागण्या पूर्ण झाला आहेत. मी सत्तेत राहून आपल्या समाजाला आरक्षण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी गवाही ना. राठोड यांनी उपस्थितांना दिली प्रास्ताविक अजाबराव जाधव, संचालन संदीप राठोड तर आभार पवन यांनी मानले.
समाजाच्या हितासाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्या- जितेंद्र महाराज
बंजारा समाजाच्या हितासाठी पोहरादेवी बंजारा भवनाची निर्मिती करून बंजारा समाजाची मनी जुळली असून बंजारा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सत्तेत राहून बजारा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर वेळ आल्यास बंजारा समाजहितासाठी मंत्रीपदाचा राजीनामा द्या, असे मत पोहरादेवी संस्थानचे महंत जितेंद्र महाराज यांनी मेळाव्यात व्यक्त केले.
Comments
Post a Comment