मीनारा मस्जिद अकोली वेस येथे जलसा "सीरत्तूंनबी"स् कार्यक्रम संपन्न!
मीनारा मस्जिद अकोली वेस येथे जलसा "सीरत्तूंनबी"स् कार्यक्रम संपन्न!
बार्शिटाकळी :- तालुका जमीअत ए उल्मा च्या वतीने स्थानिक मीनारा मस्जिद अकोली वेस येथे नुकतेच जलसा सीरत्तूंनबी स् कार्यक्रम जमीअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम यांच्या अध्यक्षते खाली व प्रमुख प्रवक्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मदरसा सहारनपूर चे मौलाना मोहम्मद माज, कारी सय्यद मोहम्मद नोमान,मुफ्ती सय्यद मोहम्मद उमर,मौलाना सय्यद मोहम्मद सोबान,मौलाना अब्दुल जब्बार अकोला आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम ची सुरुवात पवित्र कुराण पठण ने करण्यात आली नंतर हजरत मोहम्मद स् च्या जीवनावर आधारित नात शरीफ पेश करण्यात आली व जमीअत च्या त्राण्या चे वाचन करण्यात आले.
प्रमुख प्रवक्ते मौलाना सय्यद मोहम्मद उस्मान सहारनपूर (देवबंद)यांनी पैगंबर हजरत मोहम्मद स् यांच्या जीवनावर प्रभावीपणे प्रकाश टाकला त्या मध्ये त्यांचे लोकां सोबत चे व्यवहार, दैनंदिन जीवनावरील प्रकाश टाकून त्यांचे जीवनावर आधारित राहणे,वागणे,त्यांची बोल चाल आदींच्या आठवणी त्यांच्या भाषणात मांडल्या.
सदर कार्यक्रमात परिसरातील महान,पिंजर व शहरातील हजारोंच्या संख्येने लोकांनची उपस्थिती होती.यावेळी लोकांसाठी चहा पाण्याची वैवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम पार पाडण्यासाठी जमीअत चे शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान, मुफीज खान, हाजी सय्यद आशिक, हाजी सय्यद रागिब, मौलाना अजीज उल्लाह खान, हाजी मोहम्मद सलीम महक, हाजी मास्तर शब्बीर खान महान, मुफ्ती इममदाद , हाफीज मोहम्मद शाकीर, मौलवी जुनैद, दानिश खान, साकिबोद्दीन, मजहर उल इस्लाम खान, खादिम मोहम्मद सुफयान, शेख इमरान, कामरान पटेल, तमीम पटेल, मोहम्मद मुसैब, मोहम्मद शैज अरफात, मोहम्मद अकरम आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालक मुफ्ती जुबैर बेग यांनी केले प्रमुख प्रवक्ते मौलाना सय्यद मोहम्मद उस्मान यांच्या प्रार्थना (दुआ) नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर पाहुण्याची जेवणाची राहण्याची व्यवस्था हाजी जहांगीर खान बाईंडर यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती.
Comments
Post a Comment